शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

सात जिल्हे तहानलेले, वरुणराजा न बरसल्यास पिकांना फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:38 IST

- बीड, लातूरमध्ये समाधानकारक पाऊस नाही, जुलैमधील सरासरीच्या ८४ टक्केच बरसला

पुणे : मे महिन्यात कोकणात झालेली अतिवृष्टी व पूर्व विदर्भात पावसाने उशिरा लावलेली हजेरी यामुळे भात रोपवाटिकांना फटका बसला असून, परिणामी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रत्नागिरी व पालघर या जिल्ह्यांमध्ये अद्याप ४५ ते ७० टक्केच भात लागवड झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण क्षेत्राच्या ९२ टक्के अर्थात एक कोटी ३२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बीड, लातूरसारख्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची गरज असून, पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

राज्यात जुलै महिन्यात सरासरी ३३१ मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत २७८.९ मिलिमीटर पाऊस पडला असून, सरासरीच्या हा पाऊस ८४ टक्के इतका आहे. जून व जुलै या दोन महिन्यांमध्ये एकूण ४८६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात खरीप पिकांची पेरणी सरासरी एक कोटी ४४ लाख हेक्टरवर केली जाते. आतापर्यंत एक कोटी ३२ लाख हेक्टर अर्थात ९२ टक्के क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. मे महिन्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात रोपवाटिकांवर विपरीत परिणाम झाला. परिणामी शेतकऱ्यांना नव्याने रोपवाटिका तयार कराव्या लागल्या. तीच स्थिती विदर्भातील पूर्व भागातही निर्माण झाली. रत्नागिरी जिल्ह्यात ५९, तर पालघर जिल्ह्यात ७१ टक्के भात लागवड झाली आहे.कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मते पुढील आठवडाभरात भाताची पुनर्लागवड पूर्ण होईल. दरम्यान, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात खरीप पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने पुढील आठवड्याभरात पाऊस न झाल्यास पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातही पाऊस कमी असला, तरी गेल्या दोन दिवसांपासून हलका पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण कमी असून, पिकांची स्थिती मात्र उत्तम आहे. उडीद, मूग ही पिके सध्या फुलोऱ्यात असून, पाऊस झाल्यास या पिकांचे उत्पादन चांगल्या रीतीने येऊ शकेल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील सात तालुक्यांमध्ये अजूनही २५ ते ५० टक्केच पाऊस झाला आहे, तर ५४ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तसेच ७५ ते १०० टक्के पाऊस १३६ जिल्ह्यांमध्ये व १५८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

 पावसाचे कमी प्रमाण असलेले जिल्हे

नंदुरबार ५५.७१, जळगाव ७९.६३, अहिल्यानगर ७१.५२, सोलापूर ७९.४३, कोल्हापूर ७३.२८, लातूर ६९.५३, बीड ८१.५८५ वर्षांचे सरासरी क्षेत्र : १४४.३६ लाख हेक्टर

गेल्या वर्षीची अंतिम पेरणी (२० सप्टेंबर २०२४ अखेर) : १४५.८२ लाख हेक्टरगेल्या वर्षीचा याच तारखेची पेरणी : १३५.४५ लाख हेक्टर

यंदाची पेरणी : १३२.७७ लाख हेक्टरसर्वाधिक पेरणी झालेले ५ जिल्हे (क्षेत्र टक्क्यांत) : सोलापूर १२१, संभाजीनगर १००, नांदेड ९९, वर्धा ९९, धुळे ९९

कमी पेरणी झालेले ५ जिल्हे : भंडारा ४४, गोंदिया ५१, गडचिरोली ५६, रत्नागिरी ५९, पालघर ७१.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड