शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
2
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
4
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
5
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
6
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
7
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
8
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
9
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
10
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
11
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
12
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
14
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
15
विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ
16
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
17
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
18
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
19
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
20
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील सर्वात गजबजलेल्या स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:12 IST

-  मेट्रो स्टेशनसमोरील परिसरात बेकायदा स्टॉल्स उभारले गेले असून, त्याठिकाणी गॅसचा वापर सर्रासपणे केला जातो.

सहकारनगर : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राज्यभर अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरालाही विशेष सतर्कतेचा आदेश दिला असला तरी स्वारगेट मेट्रो स्टेशन परिसरातील सुरक्षाव्यवस्था मात्र रामभरोसे असल्याचे चित्र दिसत आहे.

पुण्यातील सर्वाधिक गजबजलेल्या आणि महत्त्वाचे ठिकाण असलेले स्वारगेट मेट्रो स्टेशन हे हजारो प्रवाशांची दररोजची वाहतूक पाहते. या परिसरात बसस्थानक, बाजारपेठ तसेच मोठ्चा प्रमाणावर पादचारी आणि वाहनांची वर्दळ असते. मात्र, इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे आला आहे. पुणे शहरात महानगरपालिकेने आणि पोलिस प्रशासनाने प्रत्येक प्रभागात सीसीटीव्ही बसविले असतानाही स्वारगेटसारख्या महत्त्वाच्या ठिकाणचा विसर पडल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. या ठिकाणी चोरीच्या घटना वारंवार घडत असून, पोलिस ठाण्याशी सीसीटीव्ही प्रणाली जोडलेली नाही.

कॅमेऱ्यांचे ऑडिट करापुणे शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे. विशेषतः अशा गजबजलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग तपासणी केंद्रे, चेकिंग पॉइंट वाढविणे अत्यावश्यक बनलेले आहे.

 मेट्रो स्टेशन बाहेर नेहरू स्टेडियम चौकीशेजारून काही महिन्यांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीला गेली. ही जर अवस्था पोलिसाची असेल तर सामान्य जनतेचे काय? - अमोल शुक्ल, मेट्रो प्रवासी आतापर्यंत पुणे मेट्रो यांना स्वारगेट पोलिस ठाण्याकडून सीसीटीव्हीबाबत दोन पत्रे देण्यात आली आहेत, मात्र याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही. आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करत आहोत. - यशवंत निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट

English
हिंदी सारांश
Web Title : Swargate Metro Station in Pune lacks security despite alert.

Web Summary : Despite heightened security alerts, Pune's busy Swargate Metro Station lacks CCTV surveillance, raising passenger safety concerns. Multiple thefts have occurred. Police are urging action, but the metro hasn't responded to CCTV requests.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMetroमेट्रो