शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मळणी मशीनमध्ये साडीचा स्कार्फ अडकला; वनपुरीतील शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:33 IST

- ज्वारी मळणीदरम्यान भीषण अपघात; त्याच दिवशी दुसऱ्या महिलेला थोडक्यात बचाव, मुलानेच रुग्णवाहिका चालवत मदतीला धाव

सासवड : शेतातील ज्वारी काढून झाल्यानंतर मळणी करत असताना मशीनमध्ये डोके अडकून वनपुरी (ता. पुरंदर) येथील शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगल तुकाराम कुंभारकर (वय ५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत दत्तात्रय रोहीदास यादव (रा. माळशिरस, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगल कुंभारकर या त्यांचा मुलगा विकास कुंभारकर यांच्यासह माळशिरस येथील पाटीलवस्ती परिसरातील शेतात ज्वारीची कणसे मळणी मशीनमध्ये टाकण्याचे काम करीत होत्या. त्यावेळी त्यांनी डोक्याला बांधलेला स्कार्फ मशीनच्या चक्रात अडकला आणि क्षणात त्या मशीनकडे ओढल्या गेल्या.

मशीनजवळ उभे असलेले मशीन मालक नामदेव भानुदास बनकर (रा. राजुरी, ता. पुरंदर) यांनी तत्काळ मशीन बंद करण्याचा प्रयत्न केला; मात्र काही क्षणांतच हा भीषण अपघात घडला आणि त्यात मंगल कुंभारकर यांचा जागीच मृत्यू झाला.

त्याच दिवशी दुसऱ्या महिलेचा थोडक्यात बचाव

घटनेच्या दिवशी वनपुरी येथेच अशीच आणखी एक दुर्घटना घडली. धान्य मळणी मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने चंद्रभागा मारुती कुंभारकर या जखमी झाल्या. त्यांनी वेळीच स्कार्फ सोडविल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र त्यांच्या डोक्याचे केस उपटले गेले आणि त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई जखमी असतानाही मुलगा मदतीला धावलामाळशिरस परिसरात तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने वनपुरी ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णवाहिकेचा चालक दत्तात्रय कुंभारकर हा जखमी झालेल्या चंद्रभागा कुंभारकर यांचा मुलगा आहे. स्वतःच्या आईवर उपचार सुरू असतानाही सामाजिक जबाबदारी ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णवाहिका घेऊन माळशिरस येथे धाव घेतली. तेथून मंगल कुंभारकर यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman dies in threshing machine accident in Vanpuri village.

Web Summary : A farmer woman from Vanpuri died after her scarf got caught in a threshing machine. Another woman was injured in a similar incident. The deceased's body was taken to Jejuri hospital.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघात