शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडी होणारे रस्ते आयुक्तांच्या रडारवर; प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 21:14 IST

सध्या पावसाचे दिवस असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर जागोजागी पावसाचे पाणी साचते.

पुणे : शहरातील रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शहरातील प्रमुख ३२ रस्त्यांसह वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून, कोंडी का होते? याचा अहवाल मंगळवारी, दि. २३ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या पावसाचे दिवस असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर जागोजागी पावसाचे पाणी साचते. त्यातच शहराच्या दुतर्फा अनधिकृतपणे चारचाकी व दुचाकींची पार्किंग होते. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे १० किलोमीटर अंतर जाण्यासाठी अर्धा-पाऊण तास वेळ लागतो. वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात पहिल्या १० शहरांमध्ये क्रमांक लागतो. यामुळे अनेक कंपन्या पुण्याबाहेर जात आहेत.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यांवर होणारी अनधिकृत पार्किंग यासंदर्भात ‘लोकमत’ गेण्या आठ दिवसांपासून वृत्त मालिकेच्या माध्यमातून सातत्याने प्रकाश टाकत आहे. या वृत्त मालिकेची दखल घेऊन महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील सहा रस्त्यांवर पे अँड पार्किंग करण्यासह जंगली महाराज रस्त्यावरील बहुमजली मेकॅनिकल पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

याच अनुषंगाने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी गुरुवारी महापालिकेत शहरातील वाहतुकीसंदर्भात पथ विभागासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी वाहतूक कोंडी व रस्त्याच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या २२ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल मंगळवारपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. तसेच वाहतूक कोंडीची कारणे शोधण्याच्याही सूचना केल्या आहेत. यावेळी पथ विभाग, बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ कार्यालय, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, आकाशचिन्ह या विभागांमधील अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

वाहतूक कोंडीची प्रथमदर्शनी दिसणारी कारणे ...

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे योग पद्धतीने दुरुस्त होत नसल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. याशिवाय शहरातील अनेक रस्त्यांवर व पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमध्ये हातगाडी, पथारी व्यावसायिक, स्टॉल, अनधिकृत बांधकाम आदींचा समावेश आहे. या अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा सर्व परिस्थिती जैसे थे होते. 

शहराच्या काही भागांची पाहणी केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी वाहतूकीची समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर बऱ्यापैकी समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कोंडी का होते, याची कारणमिमांसा फोटोसह सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.  - नवल किशोर राम, महापालिका आयुक्त 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस