शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

पुणेकरांनी उभारली महागड्या घरांची गुढी; सरकारच्या तिजोरीमध्ये १ हजार १६७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 14:03 IST

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महागड्या घरांची खरेदी महसूल वाढला; दस्त संख्या मात्र घटली

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात नवीन घरांच्या खरेदीत उत्साह दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली असलेली आर्थिक स्थिती, स्थिर व्याजदर, १ एप्रिलपासून रेडीरेकनरच्या दरांत होऊ घातलेली दरवाढ या पार्श्वभूमीवर शहरात १ ते २७ मार्चपर्यंत २२ हजार १३० दस्त नोंदणी झाली. त्यातून राज्य सरकारच्या तिजोरीत विक्रमी १ हजार १६७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत दस्तसंख्या कमी असली तरी जमा झालेला महसूल सर्वाधिक असल्याने उच्च किमतीच्या घरांना नागरिक पसंती देत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात दस्त संख्या अधिकची असण्याची शक्यता पुणे शहर जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी व्यक्त केली आहे.गेल्या दोन वर्षांपासून रेडीरेकनर दरांत वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदा किमान ५ ते १० टक्के वाढ होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात नवीन घरांच्या खरेदीकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. रेडीरेकनर दरांत वाढ होईल या शंकेमुळे शहरात दस्तनोंदणी ३१ मार्चपूर्वीच करण्याकडे अनेक ग्राहक व व्यावसायिकांचा कल दिसून आल्याची माहिती मुद्रांक शुल्क विभागाचे सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.८ हजार ८३७ कोटींचा महसूल जमा 

यंदा शहरात १ ते २७ मार्चपर्यंत या काळात २२ हजार १३० दस्तांची नोंदणी झाली आहे. त्याततून राज्य सरकारला १ हजार १६७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तर १ एप्रिल २०२४ पासून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत २ लाख ५२ हजार २१ दस्तांची नोंद झाली होती. यातून एकूण ८ हजार ८३७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.महसूल १० हजार ४०० कोटींपर्यंत जाणार मार्चच्या शेवटच्या चार दिवसांत आणखी किमान ५ हजार दस्त नोंदले जातील, अशी शक्यता वर्तवून हिंगाणे यांनी मार्चचा एकूण महसुलात ३०० कोटींनी वाढ होऊन तो १४५० कोटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी अर्थात २०२३-२४ या आर्थिक वर्षात शहरात एकूण दस्त नोंदणी २ लाख ९२ हजार १६१ इतकी झाली होती. त्यातून ९ हजार ३४४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा हाच महसूल १० हजार ४०० कोटींपर्यंत जाईल, अशी अपेक्षा हिंगाणे यांनी व्यक्त केली आहे.उच्च किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढमार्च महिन्याचा विचार करता दस्तांची संख्या कमी झाली आहे. मात्र, मिळालेला महसूल विक्रमी असल्याचे हिंगाणे यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ शहरात उच्च किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या गृहितकाला क्रेडाईचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनीही दुजोरा दिला आहे. शहरात आता सामान्य नागरिकही २ बीएचके घरांच्या खरेदीला पसंती देत आहे. त्यामुळेच नोंदणी व मुद्रांक शुल्कातही वाढ दिसून येत आहे, असेही नाईकनवरे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडReal Estateबांधकाम उद्योग