बारामती - कोट्यावधींचे कर्ज असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा नवा कारभारी होण्यासाठी इच्छुकांची रेकाॅर्डब्रेक गर्दी झाली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी(दि १५) अखेर ६०० नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी(दि १५) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २६१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी ७ ते १५ एप्रिल २०२५ होता; आज अखेर ६०० अर्ज दाखल (नामनिर्देशन पत्र) अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आजपर्यंत ३३९ जणांनी अर्ज दाखल केले होते.शेवटच्या दिवशी २६१ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये युती झाली आहे. अजित पवार यांनी जाचक यांच्याकडे कारखान्याची जबाबदारी दिली आहे. छत्रपती कारखान्याचे संचालक होण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. उमेदवारांच्या अर्जाचा उच्चांक झाला आहे.बुधवार(दि १६) पासुन अर्जाची छाननी सुरु होणार आहे.यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कृती समितीचे नेते यांच्याबरोबर अडचणीतील छत्रपती सहकारी साखर कारखाना बाहेर काढण्याची जबाबदारी सोपवली आहे.तसेच जाचक आगामी पाच वर्ष नेतृत्व करतील,अशी घोषणा केली आहे.त्याला काही स`थानिक भाजप पदाधिकारी यांनी विरोध दर्शविला आहे.तसेच काही अपक्षांचे पॅनल देखील निवडणुकींच्या रींगणात उतरण्याची चिन्हे आहेत.
छत्रपती कारखान्याच्या कारभारी होण्यासाठी इच्छुकांची रेकाॅर्डब्रेक गर्दी; उमेदवारी संख्या ६०० वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 20:50 IST