पुणे : मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मतचोरीविरोधातील मोर्चात सहभाग घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले. या बैठकीत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचे निर्देश दिले तसेच शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.या बैठकीत मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी यांना राज ठाकरेंनी खास करून सुनावल्याची चर्चा रंगली आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष असलेले परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आरएसएसच्या संचालनाचा फोटो पोस्ट केला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी त्यांना कार्यकर्त्यांसमोरच सुनावले. राज ठाकरे म्हणाले, छातीठोकपणे सांगतो, मी संघाचा कार्यकर्ता आहे असं म्हणताय, तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा असेही ते म्हणाले. ठाकरेंच्या या फटकार्यानंतर सभागृहात काही काळ शांतता पसरली. कार्यकर्त्यांमध्ये मात्र यावरून मोठी चर्चा रंगली असून, राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्षातील शिस्त आणि निष्ठेबाबत कडक संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे.
Web Summary : Raj Thackeray, after joining the anti-vote theft march, addressed party workers in Pune. He reprimanded a worker for RSS affiliation, stressing party loyalty. Thackeray hinted at potential alliances for upcoming elections, emphasizing the importance of discipline within the party amidst ongoing political discussions.
Web Summary : राज ठाकरे ने वोट चोरी विरोधी मार्च में भाग लेने के बाद पुणे में पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित किया। उन्होंने आरएसएस से संबद्धता के लिए एक कार्यकर्ता को फटकार लगाई, पार्टी के प्रति निष्ठा पर जोर दिया। ठाकरे ने आगामी चुनावों के लिए संभावित गठबंधनों का संकेत दिया, और चल रही राजनीतिक चर्चाओं के बीच पार्टी के भीतर अनुशासन के महत्व पर जोर दिया।