शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
4
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
5
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
6
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
8
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
9
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
10
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
11
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
12
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
13
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
14
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
15
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
16
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
17
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
18
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
19
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
20
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप

पुरंदर विमानतळ ठरणार टर्निंग पॉइंट; पुण्यासह आसपासच्या भागाला विमानतळाचा फायदा होणार - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:29 IST

- उरुळी कांचन येथे अत्याधुनिक ग्राम सचिवालयाचे उद्घाटन : पुढच्या पिढीने शेतीवर अवलंबून न राहता उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे; पुरंदर विमानतळामुळे उरुळी कांचन हे विकासाचे केंद्र बनेल

उरुळी कांचन : शहराच्या लोकसंख्येचा बोजा दिवसेंदिवस वाढतोय. लोकसंख्या वाढते, पण जमीन कमी होत आहे, शेतीची जमीन कमी होते आहे. शेतीची जमीन द्यावी लागते आणि त्याचा बदल वातावरणात दिसतो. मुंबईला हेलिकॉप्टरने जात असताना पनवेलजवळ वेगळं चित्र दिसतं, मुंबई विमानतळ तिथे होणार आहे, तिथे संस्था येतात, लोकं येतात आणि हेच चित्र पुरंदर तालुक्यामध्ये होईल, तिथे विमानतळ होत आहे. पुणे व आसपासच्या भागाला विमानतळाचा मोठा फायदा होणार आहे.सासवडमधून आलात, उरुळी कांचनमधून गेला, बारामतीमधून आला त्याचे मध्यवर्ती पुरंदर विमानतळ असेल. जुन्नर, आंबेगाव, हवेली तालुक्यात बदल दिसू लागले आहेत. पुढच्या पिढीची मानसिकता बदलली पाहिजे. फक्त शेती करून चालणार नाही, उद्योग धंद्यात उतरावे लागेल. नवीन ग्रामपंचायत कार्यालय उत्तम केले आहे; पण तिथे लोकांची कामे झाली पाहिजेत. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज व अत्याधुनिक ग्राम सचिवालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. ३१) पार पडले.

याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, बाजार समितीचे प्रकाश जगताप, योगिनी कांचन, प्रकाश मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, दादा पाटील, महादेव कांचन, हेमलता बडेकर, सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन, उपसरपंच स्वप्नीशा कांचन, मणिभाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, सोपानराव कांचन, रामभाऊ तुपे, संदीप भोंडवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप गोते, डॉ. रवींद्र भोळे, संचालक संतोष कांचन, सदस्य संतोष हरिभाऊ कांचन, राजेंद्र कांचन, भाऊसाहेब कांचन, अमित कांचन, मयूर कांचन, मिलिंद जगताप, सुनील तांबे, शंकर बडेकर, संचिता कांचन, अनिता बगाडे, अनिता तुपे, सीमा कांचन, प्रियांका पाटेकर, सायली बडेकर, सुजाता खलसे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे  उपस्थित होते. सामाजिक एकता आणि पायाभूत सुविधांवर भरखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उरुळी कांचनच्या सामाजिक एकतेचे कौतुक केले. ते म्हणाले, "राजकीय मतभेद असूनही गावाने एकोप्याची परंपरा जपली आहे. सध्याच्या राजकीय प्रवाहांपेक्षा नागरी प्रश्न आणि वाहतूक कोंडीसारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे." हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी गावाच्या झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणावर भाष्य करताना सांगितले की, "वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या अडचणी दूर करण्यासाठी गावाचा डीपीमध्ये समावेश होणे आवश्यक आहे. लोणी काळभोर मेट्रोचा उरुळी कांचनपर्यंत विस्तार व्हावा, यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे.ग्रामसचिवालय : गावाच्या विकासाचे नवे केंद्रनवीन ग्रामपंचायत कार्यालयाची ही देखणी इमारत गावकऱ्यांच्या आणि माजी सदस्यांच्या योगदानातून उभी राहिली आहे. सरपंच ऋतुजा कांचन यांनी सांगितले की, "ही इमारत गावाच्या एकजुटीचे प्रतीक आहे. येथे लोकांची कामे जलदगतीने व्हावीत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." शरद पवार यांनी यावेळी महात्मा गांधी संस्थेला दिलेल्या २५ कोटींच्या मदतीचा उल्लेख करत, त्यातून अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य मिळाल्याचे नमूद केले.मध्यवर्ती विमानतळ असेलसासवडमधून आलात, उरुळी कांचनमधून गेला, बारामतीमधून आला त्याचे मध्यवर्ती पुरंदर विमानतळ असेल. जुन्नर, आंबेगाव, हवेली तालुक्यात बदल दिसू लागले आहेत. पुढच्या पिढीची मानसिकता बदलली पाहिजे.गावात बदलाची गरजपुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीच्या जमिनी कमी होत आहेत. याचा परिणाम पर्यावरणावर होत असून, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळामुळे हवेली, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये बदल दिसू लागले आहेत. शरद पवार म्हणाले, "पुढच्या पिढीने केवळ शेतीवर अवलंबून न राहता उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारPurandarपुरंदरAirportविमानतळ