शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जनसुरक्षा कायदा की सत्ता सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:23 IST

- शहरी नक्षलवाद सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान

पुणे : केंद्रीय गृहमंत्री देशातील नक्षलवादात ७२ टक्के घट झाल्याचे सांगतात तर मग असे असताना राज्य सरकारला जनसुरक्षा कायदा लागू करण्याची गरज का भासते अशी टीका काँग्रेसने केली. शहरी नक्षलवाद आहे म्हणता तर मग तो सिद्ध करून दाखवा असे आव्हानही काँग्रेसने सरकारला दिले.

पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, गृहमंत्री २०२६ मध्ये संपूर्ण देश नक्षलवाद मुक्त होणार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. त्याच मुलाखतींमध्ये ते देशातील नक्षलवादात ७२ टक्के घट झाली असल्याचेही सांगतात. मग जनसुरक्षा कायदा का लागू केला जात आहे? ही जनतेच्या सुरक्षेची व्यवस्था आहे की स्वत:च्या सत्तेची ? सरकारच्या विरोधात कोणी काही बोलूच नये, सरकारवर टीका करू नये, सरकारच्या चुका जनतेमध्ये जाऊन सांगितल्या जाऊ नयेत यासाठीच हा नवा कायदा केला जात आहे.

केंद्र व राज्य सरकारने अनेक स्वायत्त संस्थांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. तरीही विरोधी आवाज, विरोधातील मते दडपणे त्यांना शक्य झालेले नाही. सक्त वसुली संचलनालय (इडी), निवडणूक आयोग यांना विरोधी पक्षांकडून प्रश्न विचारले जातच आहेत. हे कसे थांबवता येईल याचा विचार करून सरकार हा नवा कायदा आणत आहे असा दावा तिवारी यांनी केला.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ४० नक्षलवादी संघटना सहभागी झाल्या होत्या असा आरोप सत्ताधारी भाजपकडून केला गेला, मात्र केंद्रीय गृहखाते हाताशी असूनही त्यातील एकाही संघटनेला सरकार नक्षलवादी असल्याचे सिद्ध करू शकली नाही. विरोधात असणाऱ्यांना विनाचौकशी, विनापुरावा दीर्घ काळ तुरूंगात डांबता येणे शक्य व्हावे असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हा जनसुरक्षा कायदा नाही तर सत्तासुरक्षा कायदा आहे अशी टीका तिवारी यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेस