शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणांच्या सीसीटीव्हीसाठी धोरण तयार होणार - आमदार सिद्धार्थ शिरोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:04 IST

- स्थानिक स्वराज्य संस्थेसह पोलिस, सार्वजनिक बांधकाम तसेच अन्य सरकारी यंत्रणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय यासंबधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पुणे : सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सीसीटिव्हींसाठी आता धोरण तयार होणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसह पोलिस, सार्वजनिक बांधकाम तसेच अन्य सरकारी यंत्रणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय यासंबधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान हा विषय उपस्थित केला होता.कदम यांनी त्याचवेळी शिरोळे यांना हा विषय महत्वाचा असून यावर विचार कऱण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मुंबईत ही बैठक झाली असल्याची माहिती आमदार शिरोळे यांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येतात, मात्र ते बसवल्यानंतर त्याची देखभाल दुरूस्ती, चित्रिकरण यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा मुद्दा शिरोळे यांनी उपस्थित केला होता.मुंबईत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यामध्ये सीसीटीव्ही चे नियंत्रण स्थानिक पोलिसांकडे द्यावे, ठेकेदार कंपनीला किमान ५ वर्षांची देखभाल दुरूस्ती बंधनकारक ठेवावी, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता असे शिरोळे यांनी सांगितले. सध्या जिथे असे सीसीटीव्ही बसवले आहेत, त्यातील अनेक ठिकाणचे कॅेमेरे बंद आहेत, त्याचे चित्रिकरण होत नाही, झाले असेल तर ते मिळत नाही, त्यावरचे फुटेज कोणाकडे असावे याबाबतीत निश्चित धोरण नाही अशा अनेक गोष्टी या चर्चेदरम्यान पुढे आल्या.शिरोळे यांनी त्यावेळी राज्यातील सर्वच सावर्जनिक ठिकाणांच्या सीसीटीव्ही संबधी स्वतंत्र धोरण ठरवले जाण्याची गरज व्यक्त केली. यामुळे गुन्हेगारी स्वरूपांच्या कृत्यांवर नियंत्रण राहिल, तरीही गुन्हे झालेच तर सीसीटीव्ही चित्रिकरणामुळे गुन्हेगार उघड होतील असे सांगितले गृहराज्यमंत्री कदम यांनी ते मान्य करून धोरण ठरवण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. गृहविभागाचे प्रधान सचिव अनुप कुमारसिंग तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

पुण्यातीलच सीसीटीव्ही यंत्रणेची स्थिती समाधानकारक नाही. राज्यातील अन्य महत्वाच्या ठिकाणीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे याबाबतीत राज्यस्तरावरच निर्णय होण्याची गरज होती. आता एक धोरण ठरले तर सर्व ठिकाणाच्या सीसीटीव्ही यंत्रणांमध्ये एक सुसुत्रता येईल. देखभालीसाठी किमान ५ वर्षांचे बंधन घातले तर नादुरूस्त असण्याचा प्रश्नच राहणार नाही. - सिद्धार्थ शिरोळे, आमदार

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा