शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला पकडून पोलिसांनी काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 19:50 IST

फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्याने त्याने चक्क वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला केला

- जयवंत गंधालेहडपसर : फुरसुंगी येथील भेकराई नगर येथे सासवड रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावरच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्याने त्याने चक्क वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला केला. रस्त्यात पडलेला दगड उचलून त्याने कर्मचाऱ्यांच्या डोक्यात घातला. त्याला पकडून त्याची धिंड फुरसुंगी पोलिसांनी काढून पोलिसांवर हल्ला केल्यावर काय होईल. हे दाखवून दिले.या हल्ल्यात पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) गंभीर जखमी झाले होते. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती  यानंतर व्हिडीओ वायरल झाला होता. ट्राफिक हवालदार यांना डोक्यात दगड घालून जखमी केलेला आरोपी आदिनाथ ऊर्फ बबलू भागवत मसाळ रा. कोलवडी, मुरकुटे वस्ती याला उस्मानाबाद येथून अटक करून भेकराई नगर येथून आज सायंकाळी वाजता धिंड काढण्यात आली.यावेळी फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोढवे उपस्थित होत्या. पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात कर्तव्यास आहेत. गुरुवारी सायंकाळी ते भेकराईनगर चौकात वाहतूक नियमाचे कर्तव्य करत होते.सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या परिसरातून एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता. नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस असे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. अचानक झालेल्या या हल्ल्यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात दुचाकी चालकाविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस