शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर तालुक्यात चौरंगी लढतीचे चित्र, इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:38 IST

- पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीची आठ गण आहेत. तालुक्यात शिंदेसेनेचे विजय शिवतारे हे आमदार आहेत.

बी. एम. काळे

जेजुरी : मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या या निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दसरा-दिवाळीच्या सणाचा आसरा घेत अनेकांनी मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीची आठ गण आहेत. तालुक्यात शिंदेसेनेचे विजय शिवतारे हे आमदार आहेत. शिंदेसेना त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे, हेही स्पष्ट आहे. मात्र, काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपही नियोजन करीत आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप आणि शिवसेना यांच्यामधील द्वंद्व म्हणून रंगणार आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भूमिकेबाबत अजूनही थोडा गुपित आहे. मात्र, या दोन्ही गटांकडून उमेदवारांची पाहणी सुरू असून, त्यांच्याकडेही इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे शिंदेसेना, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांमध्ये निवडणुकीचा मुख्य फड रंगणार आहे. इतर पक्षांत काँग्रेस, उद्धवसेना, मनसे, आम आदमी पक्ष आणि इतर अपक्षांचेही उमेदवार निवडणुकीत उतरू शकतात, असे बोलले जात आहे, पण त्यांच्या ताकदीमुळे पुरंदर तालुक्यात निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.

तालुक्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, जनता दल या पक्षांचे नेते भाजपत सामील झाल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, त्याला यशस्वी प्रतिस्पर्धा करण्यासाठी शिंदेसेनेने किती प्रयत्न करायचे, युती किंवा आघाडी करू का, हे निवडणूकपर्यंत समजेल. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच विविध युती/आघाडी होण्याच्या चर्चा जोरात आहेत. भाजप विरोधात शिंदेसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी गट काँग्रेस युती करू शकतात, असेही समजते. सध्या तरी कोणतीही युती अधिकृत झालेली नाही.

शहरी भागात भाजपची मोठी ताकद असूनही, ग्रामीण भागात ती फारशी दिसत नसल्याने जर चौरंगी किंवा भाजप विरोधी आघाडी तयार झाली, तर निवडणुकीत चुरस पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने भाजपसोबत जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीत आघाडी करण्याचे आदेश दिल्याचा सुद्धा या तालुक्यात मोठा गाज आहे. चौरंगी लढतीची शक्यता धरून सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, इच्छुक उमेदवारांना निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

जाधवराव-जगदाळेंमध्ये होऊ शकतो सामना

दिवे गराडे गट हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. मागील सदस्य ज्योती झेंडे पुन्हा निवडणुकीत उतरावयास इच्छुक आहेत. या गटातून गौरी कुंजीर, संगीता काळे, वृषाली काळे, गीतांजली ढोणे, प्रतिभा कदम यांना फायदा होऊ शकतो. भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव यांच्या कन्या उदयानी जाधवराव आणि माजी तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांच्या कन्या दिव्या जगदाळे सुद्धा निवडणुकीत असू शकतात.

बेलसर-माळशिरस गट हा सर्वांसाठी खुला असल्याने येथे इच्छुकांची संख्या मोठी आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताशेठ झुरंगे पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते यांनी प्रचार सुरू केला आहे. याशिवाय माऊली यादव, बाळासाहेब कामथे, रमेश इंगळे, पोपटशेठ खेंगरे, बाळासाहेब कोलते, माणिक निंबाळकर, गणेश मुळीक यांसारख्या इच्छुकांची मोठी यादी तयार आहे. 

नीरा-कोळविहिरे गटाकडे सर्वांचे लक्ष

नीरा-कोळविहिरे गटात इतर मागासवर्गीय महिला आरक्षण असून, हा गट नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला जोडलेला आहे. मात्र, मागील निवडणुकीत शिवसेनेने इथे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या गटातून माजी आमदार अशोक टेकवडे यांची सून सानिका टेकवडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांची कन्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, तेजश्री काकडे, सुजाता दगडे, सम्रादनयी लंबाते या इच्छुकांनी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. निरेतील चव्हाण कुटुंबाकडूनही चाचपणी सुरू आहे.

शिवतारेंच्या कन्येची संधी हुकली

वीर-भिवडी गट हा शिंदेसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या गटातून विद्यमान आमदार विजय शिवतारे यांची कन्या निवडणुकीस इच्छुक मानली जात होती. मात्र, नव्याने हवेलीतील नगर परिषद नगराध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा असून, मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट आहे. दुर्दैवाने त्या पदावर मागासवर्गीयांसाठी राखीव असल्यामुळे संधी गमावली गेली. शिवाय सासवड शहरात त्यांचे नाव असल्याने या गटातून त्या निवडणूक लढवतील याची शक्यता कमी आहे.

या गटातून दिलीप आबा यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य व शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष, यांना संधी मिळवण्याची शक्यता आहे. तसेच तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे, माजी जिल्हा पत्रक सदस्य बबुसाहेब माहूरकर, पुष्कराज जाधव, राहुल गायकवाड यांचीही चर्चा जोर धरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Four-way battle likely in Purandar taluka; aspirants begin mobilization.

Web Summary : Purandar taluka gears up for Zilla Parishad and Panchayat Samiti elections. A four-way contest is anticipated between Shinde Sena, BJP, and both factions of NCP. All parties are strategizing, with potential alliances in discussion. Key candidates are emerging across various constituencies.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Puneपुणे