शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ विक्रीतून प्रवाशांची लूट;अधिकृत विक्रेत्यांकडूनच लूट सुरू असल्याने दाद कोणाकडे मागायची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:20 IST

- या दराप्रमाणेच रेल्वेगाडीत खाद्यपदार्थांची विक्री करणे बंधनकारक आहे; परंतु येथेही प्रवाशांकडून जादा दर आकारले जाते. याबाबत आयआरसीटीसी अधिकाऱ्यांना विचारले असता बोलण्यास नकार दिला.

- अंबादास गवंडीपुणे :रेल्वेस्थानकावर अमूल, नेस कॅफे, हल्दीराम, लेहर यांसह इतर महत्त्वाच्या कंपन्यांकडून विविध खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येते; परंतु या कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर किरकोळ बाजारातील दरापेक्षा दुप्पट आहेत. शिवाय खाद्यपदार्थांतील वजनात देखील फरक आहे; परंतु प्रवाशांना याची माहिती नसल्याने गरजेच्या वेळी खरेदी करावे लागते. नामांकित कंपन्यांकडूनच प्रवाशांची खुलेआम लूट होत असल्याने दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रेल्वेचा प्रवास स्वस्त असल्याने लाखो प्रवासी प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. प्रवाशांना इंडियन केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) आणि भारतीय रेल्वेकडून निविदा प्रक्रिया राबवून या कंपन्यांना रेल्वेस्थानकांवर पदार्थ विकण्यास परवानगी देण्यात येते; परंतु किरकोळ बाजार आणि रेल्वेस्थानकावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांच्या दरात मोठी तफावत आहे. प्रवाशांना गरजेच्या वेळी नाइलाजाने पदार्थ खरेदी करावे लागते. याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांवर बसतो. अधिकृत विक्रेतेच लूट करत असल्याने प्रवाशांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये चहा, कॉफी, नाष्ट्याचे दर आयआरसीटीसीने ठरवून दिलेले आहेत. या दराप्रमाणेच रेल्वेगाडीत खाद्यपदार्थांची विक्री करणे बंधनकारक आहे; परंतु येथेही प्रवाशांकडून जादा दर आकारले जाते. याबाबत आयआरसीटीसी अधिकाऱ्यांना विचारले असता बोलण्यास नकार दिला.

असे आहेत दर...

हल्दीरामच्या शेव पॅकेट किरकोळ बाजारात १० रुपयाला ३७ ग्रॅम मिळते, तर रेल्वेस्थानकावर २० रुपयाला ५२ ग्रॅम मिळते. नियमानुसार हे पदार्थ ७४ ग्रॅम मिळाले पाहिजे. लेहरची कुरकुरे किरकोळ बाजारात १० रुपयाला ३९ ग्रॅम, तर रेल्वेस्थानकावर २० रुपयाला ५२ ग्रॅम मिळते. हल्दीरामचे फरसाण किरकोळ बाजारात १० रुपयाला ३९ ग्रॅम, रेल्वे स्थानकावर २० रुपयाला ५३ ग्रॅम मिळते. अमूल कोल कॅफे किरकोळ बाजारात ३५, तर रेल्वे स्थानकावर ६० रुपये इतके जादा दराने विकले जाते.

भारतीय रेल्वे ही जनतेची मालमत्ता आहे. ती कोणत्याही कंपनीच्या नफेखोरीसाठी किंवा प्रशासनाच्या साठगाठीसाठी वापरली जाऊ देणार नाही. देशातील सर्व रेल्वेस्थानकांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या उत्पादनांबाबत सुरू असलेली लूट आता सर्वांच्या लक्षात आली आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर हा सरळसरळ डाका आहे. या गंभीर प्रकरणावर आम्ही हल्दीराम कंपनीला दोन वेळा ईमेल करून उत्तर मागितले; परंतु एकदाही प्रतिसाद दिला गेला नाही.  युवक काँग्रेस हा मुद्दा जनतेच्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढवणार आहे. - अक्षय जैन, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस 

English
हिंदी सारांश
Web Title : Railway Stations: Passengers Exploited by Overpriced Food; Who to Trust?

Web Summary : Passengers are being overcharged for food at railway stations, with prices often double that of retail stores. Popular brands like Haldiram's are implicated, raising questions about accountability and fair pricing for travelers. Youth Congress vows to fight this exploitation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpassengerप्रवासीrailwayरेल्वे