शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात रिंग रोड कामादरम्यान ऑपरेटरचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:36 IST

- विजय कुमार हा रिंग रोड प्रकल्पावर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. काम सुरू असताना तो क्रेनवर चढत असताना घसरला.

हवेली (पुणे जि.) - पुण्यातील वरदाडे परिसरात रिंग रोड प्रकल्पाच्या कामादरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विजय कुमार या तरुण ऑपरेटरचा नदीपात्रात पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा नियमांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिकच्या माहितीनुसार, विजय कुमार हा रिंग रोड प्रकल्पावर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. काम सुरू असताना तो क्रेनवर चढत असताना घसरला. शिडीवरून पाय घसरल्याने तो सुमारे ४० फूट खोल पाण्यात कोसळला. घटनावेळी लाइफ जॅकेट, सेफ्टी बेल्ट यांसारखी साधने वापरली नव्हती विजय कुमारला पोहता येत नव्हते, काही क्षणांतच त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच  स्थानिक पोलीस हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबवून काही वेळात मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "सुरक्षा नियमांचे पालन झाले असते, तर जीव वाचला असता" अशी भावना व्यक्त होत आहे.

 दरम्यान, सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष, कामगारांना आवश्यक प्रशिक्षणाचा अभाव, सुरक्षात्मक उपकरणांची कमतरता या बाबी प्राथमिक तपासात समोर आल्या आहेत. पोलीस प्रशासनाने प्रकरणाची नोंद घेतली असून  नेमकी जबाबदारी कोणाची? सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का? याचा तपास सुरू आहे. रिंग रोडसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये अशा घटना घडल्याने  कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते का? नियम फक्त कागदावरच आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Ring Road Tragedy: Operator Dies, Safety Concerns Arise

Web Summary : A tragic accident at Pune's Ring Road project claimed an operator's life. Vijay Kumar fell into a riverbed while working, raising serious questions about safety measures. Lack of safety gear and training are being investigated. Negligence may be a factor.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघात