शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

भोर नगरपरिषदेची नवीन प्रभाग रचना जाहीर; ८ ऐवजी १० प्रभाग, तर १७ ऐवजी २० नगरसेवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:58 IST

- पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १३ ऑगस्ट २०२५ रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या रचनेचा तपशील नगरपरिषदेच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भोर :भोर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या या प्रारूप प्रभाग रचनेत ८ ऐवजी १० प्रभाग असणार आहेत, तर नगरसेवकांची संख्या १७ वरून २० इतकी वाढली आहे. यामुळे २ प्रभाग आणि ३ नगरसेवक वाढले आहेत.या प्रारूप रचनेवर नागरिकांना ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार, भोर नगरपरिषदेने प्रारूप प्रभाग रचना तयार केली असून, ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगरविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आली आहे. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १३ ऑगस्ट २०२५ रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या रचनेचा तपशील नगरपरिषदेच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रभाग रचनेची वैशिष्ट्ये

प्रभाग संख्या : ८ वरून १० प्रभाग.

नगरसेवक संख्या : १७ वरून २० नगरसेवक.

लोकसंख्या : प्रत्येक प्रभागात १,७०० ते २,०००.

नगरसेवक निवड : प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार

प्रभागनिहाय तपशील

प्रभाग क्रमांक १ : भोरेश्वर नगर, न्हावी परीट आळी, भेलकेवाडी, हनुमान मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर.

प्रभाग क्रमांक २ : आमराई संकुल, काळा दत्त मंदिर, मातोश्री अहिल्यादेवी होळकर प्राथमिक. विद्यालय, नवरंग मित्र मंडळ, टोकेकर गणपती, भोरेश्वर मंदिर, तहसील कार्यालय, राजवाडा चौक, विनायक भोजनालय, रथखाना शाळा.

प्रभाग क्रमांक ३ : राजवाडा, जिजामाता शाळा, फॉरेस्ट ऑफिस, सम्राट चौक, भोर पोस्ट ऑफिस, आयडीबीआय बँक, नाना-नानी पार्क, हॉटेल राजे, खान हॉस्पिटल, दीक्षाभूमी.

प्रभाग क्रमांक ४ : स्वप्नलोकनगरी, धुमाळनगर, भोर न्यायालय, नगरपरिषद, गंगूताई वाचनालय, संगीता कोल्ड्रिंक्स, अंबिका ज्वेलर्स, सुभाष जनरल स्टोअर.

प्रभाग क्रमांक ५ : भोर बस स्टॅण्ड, तक्षशीलानगर, हॉटेल शिवकृपा, एस. टी. वर्कशॉप, भोर रुग्णालय, रामबाग, हॉटेल जयश्री, एचडीएफसी बँक, जवाहर तरुण मंडळ, पुणे जिल्हा सहकारी बँक.

प्रभाग क्रमांक ६ : भूमिअभिलेख कार्यालय, महाराणा प्रताप शाळा क्र. १, मक्का मस्जिद, कांचन झेरॉक्स, श्रीपतीनगर, खरेदी-विक्री संघ, चिकने मेडिकल.

प्रभाग क्रमांक ७ : संत गाडगेबाबा महाराज प्राथमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल व कॉलेज, बुरांडे हॉस्पिटल, सोनाली गार्डन, पंचायत समिती रेस्ट हाऊस, नागोबा आळी, भोई आळी, जामा मस्जिद.

प्रभाग क्रमांक ८ : महाड नाका, वनवासी आश्रम, भेलकेवाडी, भोई आळी, श्रेयारंभ बिल्डिंग.

प्रभाग क्रमांक ९ : शिक्षक कॉलनी, पेशवाई हॉटेल, स्वामी समर्थ मंदिर, अनंतराव थोपटे कॉलेज, नप जलशुद्धीकरण केंद्र, अभिजित मंगल कार्यालय, सह्याद्री मंगल कार्यालय, शिव मल्हार खंडोबा मंदिर, जवाहर कुस्ती संकुल.

प्रभाग क्रमांक १० : धनगर वस्ती भोरदरा, वाघजाई माता मंदिर, विद्या प्रतिष्ठान कॅम्पस, वाघजाई नगर, आयटीआय कॉलेज, विद्यानगर, भावे भारत गॅस, छत्रपती शिवाजी महाराज चौक चौपाटी, रोबोकॉब कॉम्प्युटर्स.

नागरिकांना आवाहन

नवीन प्रभाग रचनेमुळे काहींना फायदा, तर काहींना तोटा झाला आहे. त्यामुळे इच्छुकांचे लक्ष आता नगराध्यक्षपद आणि नगरसेवक आरक्षणाकडे लागले आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी नागरिकांना सक्रिय सहभाग नोंदवून योग्य त्या हरकती आणि सूचना सादर करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbhor-acभोर