शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘कारखाना बंद पडण्यापूर्वी माझे हृदय बंद पडेल’, पृथ्वीराज जाचक यांची सभासदांना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:36 IST

यंदा सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यांबरोबरच ‘छत्रपती’ उसाचा पहिला हप्ता देणार आहे. गेल्या दहा वर्षांत कारखान्याचा कारभार चुकीचा झाला.

बारामती/सणसर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सभासदांना भावनिक साद घालत म्हटले की, “आम्ही सर्व २१ संचालक ‘छत्रपती’चे नोकर आहोत. कारखाना ऐतिहासिक वळणावर आहे. काहीजण खोड्या घालून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्थिक अडचणी असल्या, तरी ‘छत्रपती’ बंद पडू देणार नाही. त्यापूर्वी माझे हृदय बंद पडेल.” यंदा १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य न झाल्यास पुढील गळीत हंगामाबाबत विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रविवारी (दि. २७ सप्टेंबर) भवानीनगर (ता. इंदापूर) येथे झालेल्या २०२२ ते २०२५ या तीन आर्थिक वर्षांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाचक यांनी सभासदांना कारखान्याच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. “यंदा सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यांबरोबरच ‘छत्रपती’ उसाचा पहिला हप्ता देणार आहे. गेल्या दहा वर्षांत कारखान्याचा कारभार चुकीचा झाला. मागील हंगामात ४७ कोटी आणि त्यापूर्वी २९ कोटींचा तोटा झाला. तरीही कारखाना सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले. ऊसतोडणी नियमानुसार होईल आणि हुमणी लागलेल्या, तसेच पूरग्रस्त भागातील उसाला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.सभेत एकूण १४ विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये डोर्लेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलसाठी रयत शिक्षण संस्थेला भाडेतत्त्वावर दिलेली जागा आणि इमारत हस्तांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. अशोक काळे यांनी १२ लाख टन गाळपासाठी आवश्यक बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली. बाळासाहेब शिंदे यांनी सणसर ग्रामपंचायतीला २०२३ पर्यंतचा ॲडव्हान्स कर दिल्याबाबत आक्षेप नोंदवला. सतीश काटे आणि रवींद्र टकले यांनी स्क्रॅप विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला, तर माजी अध्यक्ष प्रशांत काटे यांनी कागदपत्रे तपासण्याची सूचना केली. जाचक यांनीही कोणतीही माहिती देण्यास तयार असल्याचे सांगितले. ॲड. प्रशांत पवार यांनी बाहेरील ऊस देणाऱ्यांवर समान न्यायाने कारवाई करण्याची मागणी केली. ॲड. अमोल सातकर यांनी कार्यकारी संचालकांच्या बंगल्यासाठी तीन सुरक्षारक्षक असल्याकडे लक्ष वेधले.

 ‘दादा आणि मामा नसते तर कारखाना सुरू होणे अवघड होते’

भाजप नेते तानाजी थोरात यांनी कारखाना राजकीय अड्डा झाल्याचा आरोप करत फ्लेक्सवर फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचेच छायाचित्र लावल्याचा आक्षेप घेतला. यावर जाचक यांनी, “दादा’ आणि ‘मामा’ नसते तर कारखाना सुरू होणे अवघड झाले असते. त्यांचे छायाचित्र लावले तर काय बिघडले? ते आपल्या कारखान्याचे सभासद आहेत,” असे उत्तर देत आरोप खोडून काढला. 

शासकीय लेखापरीक्षकांकडून साखर स्टॉक तपासणीसभेत शासकीय लेखापरीक्षकांकडून कारखान्यातील साखरेच्या स्टॉकची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तफावत आढळल्यास संबंधितांवर कारवाई करून वसुली करण्यात येईल, असे जाचक यांनी जाहीर केले. तसेच, सतीश काटे यांनी लेखापरीक्षण अहवालात शासकीय नियमांचे पालन न करता सेवक भरती झाल्याचे नमूद असल्याचे सांगितले. यावर माजी अध्यक्ष प्रशांत काटे यांनी ठराव न दाखविल्याने लेखापरीक्षकांनी संचालक मंडळाकडे बोट दाखविल्याचे स्पष्ट केले. जाचक यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Factory closure before my heart stops: Prithviraj Jachak's emotional appeal.

Web Summary : Prithviraj Jachak vowed to prevent the 'Chhatrapati' sugar factory's closure, prioritizing sugarcane harvesting for flood-affected areas. He addressed past losses, promising improvements and transparency. The assembly approved resolutions, debated financial matters, and addressed allegations of corruption. Stock verification will occur following complaints.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेSugar factoryसाखर कारखानेBaramatiबारामती