शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एमआयडीसीचा सार्वजनिक वाहनतळ खासगी वापरासाठी; वाहनतळाच्या अर्ध्या जागेवर खासगी कंपनीचा माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 20:15 IST

- वाहनांना जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यावर पार्किंग; प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह

चाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रातील जड-अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी एमआयडीसीकडून वाहनतळ उभारण्यात आला आहे. परंतु या वाहनतळावर वाहनांऐवजी एका खासगी कंपनीचा माल साठवण्यात आल्याने कुंपणच शेत खातंय  असा प्रकार समोर आला आहे. यामुळे वाहनचालक आणि स्थानिक उद्योजकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. मुख्य महामार्गांलगत आणि एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांवर ही वाहने पार्किंग केली जात असल्याने यामुळे वाहतूक कोंडीला हातभार लागला आहे.

यामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीने कच्चा-पक्का माल घेऊन येणाऱ्या अवजड वाहने, ट्रक आणि ट्रेलर पार्किंगसाठी लाखो रुपयांचा खर्च करून महाळुंगे एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक दोनमधील भूखंड क्रमांक एएम २/२, एचपी चौक ते सावरदरीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत, जवळपास २,५०० चौरस मीटर जागेत हा वाहनतळ उभारला आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहनतळाचा वापर करणाऱ्या चालकांकडून ठराविक शुल्क आकारून येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळाची देखभाल आणि व्यवस्थापनासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्याने एमआयडीसीने खासगी ठेकेदाराला काही अटी आणि नियमांवर भाडेतत्त्वावर हे काम सोपविण्यात आले आहे.

मात्र या वाहनतळाचा अर्धा भाग पार्टिशन टाकून वाहनांऐवजी या ठेकेदाराने अर्ध्या जागेवर एका खासगी कंपनीचे मटेरियल साठवण्यासह इतर व्यावसायिक वापरास दिला आहे. यामुळे वाहनतळावर पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनधारकांना जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे नाइलाजाने त्यांना रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाहनतळ हा वाहनांच्या पार्किंगसाठी चालवण्यास दिला आहे. वाहने येत नसल्याचे कारण सांगत ठेकेदाराकडून वाहनतळाच्या अर्ध्या भागात वाहनांऐवजी मालसाठवण का केली जाते ? आणि कोणाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे ? सार्वजनिक वाहनतळ खासगी स्वार्थासाठी वापरणे हा प्रशासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा प्रकार आहे. संबंधित ठेकेदारासह मालसाठवण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वाहनचालक आणि उद्योजकांकडून केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MIDC Parking Lot Misused: Private Company Storing Goods Illegally.

Web Summary : In Chakan, an MIDC parking lot intended for heavy vehicles is being misused. A private company is storing goods on half the space, denying parking to drivers and causing traffic congestion. Locals demand action.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे