शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅन तयार ..! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा होणार कायाकल्प;छाननी, चर्चा करून करणार खांदेपालट

By राजू इनामदार | Updated: April 15, 2025 20:04 IST

पक्षाला सक्रिय करण्याबरोबरच सपकाळ यांनी जबाबदाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्याची मोहीमही सुरू केली आहे.

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ नियुक्त केलेल्या निरीक्षकांचे जिल्हा व शहरनिहाय अहवाल प्रदेश काँग्रेसला प्राप्त झाले आहेत. आता या अहवालांची छाननी करून, तेथील संबंधितांबरोबर चर्चा करून त्या-त्या शहर व जिल्ह्यात खांदेपालट करण्यात येणार आहे. यामध्ये युवा कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्याचा व सक्रिय नसणाऱ्या ज्येष्ठांना मार्गदर्शक करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. निरीक्षकांना त्यादृष्टीनेही चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.सलग तीन पंचवार्षिकमध्ये काही अपवाद वगळता सातत्याने पराभव पत्करावा लागल्याने राज्यातील काँग्रेसची राजकीय स्थिती नाजूक झाली आहे. त्यातही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सपाटून मार बसला. त्याची परिणीती प्रदेशाध्यक्ष बदलात झाली. माजी आमदार असलेले नवे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडून पक्षाला बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांनीही सूत्रे हातीच घेताच कामाला सुरुवात केली आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात गाजलेल्या बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी मस्साजोग ते बीड अशी दोन दिवसांची सदभावना यात्रा काढली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दंगलग्रस्त नागपुरात ते अशीच यात्रा काढत आहेत. पक्षाला सक्रिय करण्याबरोबरच सपकाळ यांनी जबाबदाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्याची मोहीमही सुरू केली आहे. 

पक्षाचा चेहरा तरुण करण्याचा प्रयत्नआता एकएक अहवाल मिळत आहेत. पक्षात ज्येष्ठ, अनुभवी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे स्थान नेहमीच महत्त्वाचे असते. त्यांच्याबरोबर चर्चा करून, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यात येईल. मात्र त्याचबरोबर पक्षाला एक नवी सळसळीत ओळख मिळावी असाही प्रयत्न आहे. वैचारिक बैठक पक्की असलेले, पक्षनिष्ठा ठेवणारे व प्रसंगी ती सिद्धही करणारे नवे पदाधिकारी पक्षाला देण्याचा विचार आहे. हा बदल काही लगेच होईल असे नाही, मात्र त्यादृष्टिने वाटचाल करण्याचा विचार आहे. - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाcongressकाँग्रेस