Local Body Election : निवडणुकीतून माघार घ्या; अन्यथा संतोष देशमुख करू..! AAP उमेदवाराला धमकी

By किरण शिंदे | Updated: December 2, 2025 13:50 IST2025-12-02T13:48:30+5:302025-12-02T13:50:36+5:30

“निवडणुकीतून माघार घ्या, अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू,” अशा शब्दांत धमकी देत बनसोडे यांची कार अडवण्यात आल्याबद्दल अज्ञात आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

pune news Local Body Election Withdraw from the election otherwise Santosh Deshmukh will do it Threat to AAP candidate | Local Body Election : निवडणुकीतून माघार घ्या; अन्यथा संतोष देशमुख करू..! AAP उमेदवाराला धमकी

Local Body Election : निवडणुकीतून माघार घ्या; अन्यथा संतोष देशमुख करू..! AAP उमेदवाराला धमकी

पुणे : फुरसुंगी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आम आदमी पार्टीचे उमेदवार यशवंत अरुण बनसोडे (वय ४२) यांना अज्ञात व्यक्तीने कार अडवून जीवघेणी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. “निवडणुकीतून माघार घ्या, अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू,” अशा शब्दांत धमकी देत बनसोडे यांची कार अडवण्यात आल्याबद्दल अज्ञात आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत बनसोडे हे १ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास सासवड रोड रेल्वे स्टेशन परिसरातून चारचाकीने जात होते. त्याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने हात दाखवून त्यांचे वाहन थांबवले. वाहन थांबवतात तोच तो इसम पुढे आला आणि निवडणुकीतून माघार घेण्यास जबरदस्ती करत धमकी दिली. माघार नाही घेतली तर तुमचा संतोष देशमुख करू अशा शब्दात त्याने धमकी दिली. फिर्यादींच्या तक्रारीनुसार त्या इसमाच्या कमरेला लोखंडी शस्त्र लपवलेले होते. एवढेच नव्हे तर रेल्वे पटरीजवळ दुसरा एक अनोळखी व्यक्ती उभा असल्याचेही त्यांनी पाहिले. त्याच्याजवळ देखील शस्त्र असण्याची शक्यता तक्रारीत नमूद आहे. ही संपूर्ण घटना पाहून फिर्यादींनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.

फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), ३५२(३) तसेच महाराष्ट्र पोलीस संरक्षण अधिनियम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश नलवडे या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक स्थगित केली आहे. नगराध्यक्ष, सदस्य व इतर सर्व पदांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया पुन्हा ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र निवडणूक स्थगित असतानाही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच धमकी देण्यात आल्याने  खळबळ उडाली आहे.

Web Title : स्थानीय चुनाव से AAP उम्मीदवार को नाम वापस लेने की धमकी

Web Summary : आप उम्मीदवार यशवंत बनसोडे को फुरसुंगी नगर परिषद चुनाव से नाम वापस लेने के लिए जान से मारने की धमकी मिली। पुलिस ने अज्ञात व्यक्तियों के खिलाफ मामला दर्ज किया। चुनाव स्थगित, जांच जारी।

Web Title : AAP Candidate Threatened to Withdraw from Local Election

Web Summary : AAP candidate Yashwant Bansode received death threats, pressured to withdraw from the Furursungi Nagar Parishad election. Police have registered a case against unknown individuals. Election postponed, probe ongoing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.