Local Body Election : चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि.२ ) सुरू असलेल्या मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांसह वृद्ध मतदारांचीही विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. सकाळी साडे ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान २२.६० टक्के मतदान झाले आहे. चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपदाच्या २२ जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ३६ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. सर्व मतदान केंद्रात एकूण ३६ मतदान यंत्र (ईव्हीएम) आहेत.
प्रगत समाजघटक आणि लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी मतदान करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने आवाहन केल्याने ज्येष्ठ मतदारांचा उत्साह पाहून तरुण मतदारांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचे चित्र केंद्रांवर दिसून येत आहे.
दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन केले आहे. दिव्यांग आणि वृद्धांसाठी व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, सावलीची सोय, स्वतंत्र रांगेची व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. किरकोळ अपवाद वगळता सर्व मतदान केंद्रांवर शांततेत आणि संयमाने मतदान प्रक्रिया सुरू असून कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. लोकशाहीच्या सन्मानार्थ मतदारांचा वाढता सहभाग समाधानकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले. संध्याकाळपर्यंत मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मतदान केंद्रावर सुरक्षा तसेच शहरात सुरक्षेसाठी ३०० पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. यामध्ये राज्य राखीव पोलिस दल, आरसीपी, सशख पोलिस दल, होमगार्ड आदी ठेवलेले आहेत. चाकण शहात कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील नाही.
Web Summary : Chakan Municipal Council elections saw enthusiastic participation, including senior citizens. Twenty-two percent voter turnout was recorded by noon. Voting proceeded peacefully with good arrangements. Heavy police security deployed.
Web Summary : चाकण नगर परिषद चुनाव में वरिष्ठ नागरिकों सहित उत्साहपूर्ण भागीदारी देखी गई। दोपहर तक बाईस प्रतिशत मतदान दर्ज किया गया। अच्छी व्यवस्था के साथ शांतिपूर्वक मतदान हुआ। भारी पुलिस सुरक्षा तैनात।