कोथरूड : कोथरूड येथील पुणे महानगरपालिकेची कै. जयाबाई नानासाहेब सुतार (मॅटर्निटी हॉस्पिटल), नानासाहेब सुतार (दवाखाना), कै. शंकरराव धोंडिबा सुतार (मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल) आहेत. या रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याने रुग्ण आणि नातेवाईकांना भोगावा लागत असलेला त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन पेमेंटसारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने बिल भरण्यापासून तपासणीपर्यंत प्रत्येक ठिकाणी नागरिकांना हेळसांड सहन करावी लागत आहे. रोख रक्कम बरोबर नसेल तर जणू गुन्हा ठरतो आहे. रोकड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागते. अनेकवेळा त्यामुळे उपचारातही विलंब होत असल्याची तक्रार रुग्णांकडून केली जात आहे.
बऱ्याचवेळा येथील कर्मचारी रुग्णांशी अर्वाच्च भाषेत बोलत असल्याचा धक्कादायक आरोपही पुढे आला आहे. आधीच शारीरिक-मानसिक त्रासात असलेल्या रुग्णांना अशा वागणुकीमुळे अधिकच क्लेश सहन करावा लागत आहे. रुग्णालयाच्या आसपास योग्य दिशादर्शक फलक नसल्याने प्रथमच येणाऱ्या नागरिकांना रुग्णालय सापडण्यासाठी समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेची माहिती देणारा फलक रुग्णालय परिसरात नसल्याने पात्र रुग्णांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडथळा निर्माण होत आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि रुग्णांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेत तातडीने सुविधा सुधाराव्यात, ऑनलाइन पेमेंट तसेच मार्गदर्शन फलकाची व्यवस्था करावी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर कठोर नियंत्रण आणावे, अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे. दवाखान्याचा कॅश भरणा आम्ही करतो. मात्र अजूनही ऑनलाईन सुविधा सुरू झालेली नाही. ज्याठिकाणी योजनांची माहिती पत्रक नाहीत तेथे आम्ही फलक बसवून घेऊ.
पुणे महानगरपालिकेच्या कोथरूडमधील जयाबाई सुतार हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी धनुर्वाताची इंजेक्शन उपलब्ध नसणे व नागरिकांना ती बाहेरून विकत आणण्यास सांगणे, असा लाजिरवाणा प्रकार होत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून, नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यास ते असमर्थ ठरत आहेत. - ॲड. अमोल काळे, स्थानिक नागरिक
Web Summary : Patients at Sutar Hospital in Kothrud face hardship due to the lack of online payment options, forcing them to scramble for cash. Poor staff behavior and missing informational signs compound patient woes, hindering access to schemes.
Web Summary : कोथरूड के सुतार अस्पताल में ऑनलाइन भुगतान की सुविधा नहीं होने से मरीजों को नकदी के लिए भटकना पड़ता है। कर्मचारियों का खराब व्यवहार और सूचनात्मक संकेतों की कमी से मरीजों की परेशानी बढ़ जाती है, जिससे योजनाओं तक पहुंच बाधित होती है।