ठाणे, रिक्षा, चष्मा,दाढी, गुवाहाटी अन् गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ? ठाकरे गटानं शिवसेनेला डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:00 IST2025-03-26T12:57:41+5:302025-03-26T13:00:24+5:30

पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनरबाजी

pune news Kunal Kamra Are the words Thane, rickshaw, glasses, beard, Guwahati and traitor banned in Maharashtra? Thackeray group challenges Shiv Sena | ठाणे, रिक्षा, चष्मा,दाढी, गुवाहाटी अन् गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ? ठाकरे गटानं शिवसेनेला डिवचलं

ठाणे, रिक्षा, चष्मा,दाढी, गुवाहाटी अन् गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ? ठाकरे गटानं शिवसेनेला डिवचलं

पुणे -  स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने रविवारी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक गाणे पोस्ट केले. या गाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला आहे. यामुळे आता नवीन वाद सुरू झाला आहे. अशात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरासाठी तीन ओळींचे एक ट्विट केले आहे. 'हा तर आपल्यासारखा निघाला. हा सुद्धा झुकणार नाही.जय महाराष्ट्र!', असं ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटले आहे.

 




तर आज पुण्यात कुणाल कामरा प्रकरणावरून पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शिवसेनेला डिवचल आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी केली आहे. कुणाल कामराच्या कवितेचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने बॅनरबाजी केल्याचे या बॅनरवरील मजकुरातून लक्षात येते. ठाणे, रिक्षा, चष्मा ,दाढी , गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ?" असा प्रश्नही या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्यासह कुणाल कामरा यांचा फोटोही लावण्यात आला आहे.

सावधान..! एका क्लिकमुळे बँक खाते होईल रिकामे;‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’साठी असुरक्षित नोंदणी

तत्पूर्वी, भारताचे आणखी एक राष्ट्रगीत म्हणत कुणालने हे गाणं गायलं. "हम होंगे कंगाल एक दिन, मन में है अंधविश्वास, देश का सत्यानाश. होंने नगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर पुलिस के पंगे चारों ओर. एक दिन मन में नथूराम, हरकतें आसाराम. हम होंगे कंगाल एक दिन..'असं गाणं कुणाल कामराने गायलं.




गाण्याच्या व्हिडीओमध्ये शिंदे गटाचे शिवसैनिक क्लबची तोडफोड करताना दिसत आहेत. तर काहीजण कामराच्या पुतळ्यासोबत तर काही त्याच्या फोटोसोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये शिवसेना नेते राहुल कनाल यांचेही फुटेज वापरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

Web Title: pune news Kunal Kamra Are the words Thane, rickshaw, glasses, beard, Guwahati and traitor banned in Maharashtra? Thackeray group challenges Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.