शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

युद्धविरामानंतर तांदळाला 'भाव' निर्यातीमध्ये मोठी वाढ

By अजित घस्ते | Updated: April 19, 2026 13:18 IST

- कडधान्ये आणि जीवनावश्यक वस्तूंचाही उठाव वाढला -मार्केटयार्ड भुसार बाजारात ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : जागतिकस्तरावर काही भागांतील युद्धजन्य परिस्थिती निवळताच आणि निर्बंधांमध्ये शिथिलता येताच, पुणे मार्केटयार्डातून तांदळाच्या निर्यातीने वेग घेतला आहे. युद्धाच्या सावटाखाली मंदावलेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आता पुन्हा एकदा गजबजली असून, तांदळासोबतच गहू, ज्वारी इतर कडधान्ये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीतही मोठी मागणी वाढल्याचे चित्र सध्या मार्केटयार्ड भुसार बाजारात पाहायला मिळत आहे.

गहू, ज्वारी, तांदूळ व कडधान्य अशा जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ झाली असून, सध्या उठाव वाढल्याने बाजारपेठेत तेजीत आहे. मागणी वाढल्याने मालाची आवक आणि जावक या दोन्ही पातळ्यांवर मार्केटयार्डात लगबग वाढली आहे. मार्केटयार्डत लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मागणीसोबतच बाहेरच्या राज्यांतूनही मालाला चांगली पसंती मिळत आहे.

- बासमती तांदळाची परदेशात ''धूम''

गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आता पूर्वपदावर येत आहे. जगभरात भारतीय बासमती तांदळाला मागणी अधिक असते. त्यामुळे आता विशेषतः बासमती आणि कोलम तांदळाच्या निर्यातीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे थांबलेली जहाजे आता मार्गस्थ होत असल्याने तांदूळ निर्यात मागणी वाढली असून, स्थानिक बाजारातही तांदळाला चांगली बाजारपेठ मिळत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

येथे होते निर्यात : बासमती तांदूळ निर्यातीमध्ये सौदी अरेबिया, इराक, इराण, येमेन, युएई, तसेच युरोप व अमेरिकेमध्ये तांदळाला सर्वाधिक मागणी आहे.

साठवणुकीसाठी लागणाऱ्या वस्तूमध्ये गहू, तांदूळ सर्वाधिक मागणी : उन्हाळ्यात सुटी पडल्याने बाजारात सध्या बाजारात १२ महिने साठवणुकीसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत गहू, तांदूळ, ज्वारी इतर कडधान्ये आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.  खरेदीसाठी बाजारात गर्दी

असे आहेत मार्केटयार्ड भुसार बाजारातील सध्याचे दर

बासमतीचे प्रकार            बाजार भाव प्रतिक्विंटल

पारंपरिक बासमती - १२,००० ते १४,०००/-

११२१ बासमती स्टीम - ११,००० ते १२,०००/-

१५०९ बासमती स्टीम - १०,००० ते ११,०००/-

१४०१ बासमती स्टीम - ११,५०० ते १२,५००/-

सेला बासमती - ९,५०० ते १०,०००/-

गहू लोकवन -  ३५०० ते ४५००

गावरान ज्वारी - ५५०० ते ६५००

तूर डाळी - १२००० ते १५०००

शेंगदाणे - १२५०० ते १४०००

खाद्य तेल - १५ किलो डबा २४५० ते २५००

युद्धजन्य परिस्थिती विराम मिळाल्यानंतर तांदूळ निर्यात वाढली आहे. सध्या बासमती व बिगर बासमती तांदळाला चांगली मागणी आहे. सध्या मार्केटयार्ड बाजारात १२ महिने साठवणुकीसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूच्या मागणीत वाढ झाली असून खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र, नैसर्गिक आपत्ती व अवकाळी पावसामुळे उत्पादन क्षेत्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे चांगल्या मालाची प्रत कमी आहे. - अभय संचेती ज्येष्ठ व्यापारी मार्केटयार्ड. 

एप्रिलमध्ये नवीन माल बाजारात येत असतो. यामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ बरोबर इतर कडधान्ये खरेदी केली जाते. त्यात उन्हाळ्यातील सण-समारंभ आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदीही वाढली आहे. त्यामुळे मार्केटयार्ड परिसरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंड चेंबर. 

सध्या उन्हाळ्यात सुट्टी पडली असल्याने साठवून साठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी लोणीकाळभोरवरून खरेदीसाठी आले होते. मार्केट यार्ड बाजारात स्वस्त व चांगले वस्तू मिळतात म्हणून १२ महिने साठवून किराणा वस्तू खरेदी केली.- पूजा मोहिते गृहिणी

English
हिंदी सारांश
Web Title : Rice Exports Surge After Ceasefire: Prices Rise Significantly

Web Summary : Pune market sees increased rice exports as global tensions ease. Demand rises for rice, wheat, and pulses due to weddings, festivals, and storage needs. Basmati rice exports to Saudi Arabia, US and Europe increase.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे