शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोटगीची थकीत रक्कम न भरल्याने पतीला महिन्याचा साधा कारावास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:01 IST

पतीने पोटगीची किमान १ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम भरली तरच त्याची सुटका केली जाईल

पुणे : पत्नीला दरमहा अंतरिम पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने पतीला दिला होता. मात्र, पतीने पत्नीला पोटगीची रक्कम न दिल्याने पत्नीचे जगणे बिकट झाले होते. तिने प्रलंबित पोटगीसाठी न्यायालयात पुन्हा अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने पतीविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर पोलिसांनी पतीला न्यायालयात हजर केले. मात्र, पोटगीची १४ लाख रुपयांची थकीत रक्कम भरण्यास पतीने पुनश्च नकार दिल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खंदारे यांनी पतीला एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

पतीने पोटगीची किमान १ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम भरली तरच त्याची सुटका केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ॲड. जयपाल पाटील आणि ॲड. सुखदेव सानप यांनी न्यायालयात पत्नीची बाजू मांडली.स्मिता आणि राकेश (नावे बदललेली) यांचे लग्न १७ जानेवारी २०१३ मध्ये झाले. दोघांना एक मुलगी आहे. माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून पती तिला कायम टोचून बोलायचा. पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करण्याबरोबरच जिवे मारण्याचा प्रयत्नही त्याने केला होता. त्यामुळे स्मिता राकेशपासून वेगळी राहू लागली. स्मिताने कौटुंबिक हिंसाचारांतर्गत न्यायालयात अर्ज दाखल करून पोटगीची मागणी केली. त्यानुसार २०२२ मध्ये न्यायालयाने पत्नीला २७ हजार रुपये अंतरिम पोटगी मंजूर केली. तरीही पतीने तिला पोटगीची रक्कम दिली नाही. या निर्णयाविरुद्ध पतीच्या वकिलांनी अपील दाखल केल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र असे कोणतेही अपील केल्याचे आढळले नाही. ही पोटगीची थकीत रक्कम १४ लाखांच्या घरात पोहोचली. त्यामुळे पत्नीने थकीत पोटगीची रक्कम मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने पतीला समन्स पाठविले. त्यालाही प्रतिसाद न दिल्याने पतीविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले.पोलिसांनी पतीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी पतीला थकीत रक्कम भरण्याबाबत विचारणा केली. मात्र, पतीने रक्कम भरण्यास नकार दर्शविला. त्यामुळे न्यायालयाने पतीला एक महिन्याचा साधा कारावास सुनावत त्याची कारागृहात रवानगी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या