शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

Video : बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली नियंत्रण सुटल्याने भरधाव कार आदळली मेट्रोच्या खांबाला; तीन तरुणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:12 IST

- पहाटे पाचच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली झाला भीषण अपघात

पुणे -  भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती मेट्रोच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली घडली. मृतांमध्ये दोन चुलत भावांचा समावेश आहे. कारमध्ये बिअरची बाटली सापडल्याने हा ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या भीषण अपघातामध्ये कारचा (एमएच १४ डी टी ८२९२) चुराडा झाला. या घटनेमुळे पुणेकरांना पोर्शे कार अपघाताची आठवण झाली. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून, अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे.

यश प्रसाद भंडारी (२३, रा.थेरगाव, पिंपरी चिंचवड), ऋत्विक उर्फ ओम विनायक भंडारी (२३, रा. पिंपरी गाव) आणि खुशवंत किशोर टेकवाणी (१९, रा. बीड) अशी मृतांची नावे आहेत. यश आणि ऋत्विक चुलत भाऊ आहेत. ऋत्विकने एमबीए फायनान्सचे शिक्षण घेतले असून तो एका खासगी कंपनीत काम करतो, तर यश आयटी कंपनीत नोकरीला होता. खुशवंत हा कोथरूड परिसरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.टेक.चे शिक्षण घेत होता. यश आणि ऋत्विक यांच्यासोबत खुशवंतची मैत्री नेमकी कशी झाली याबाबत पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २) पहाटे पावणे पाचच्या सुमारास नियंत्रण कक्षाला कॉल आला. घटनास्थळी बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे मार्शल पोहोचले. तेव्हा बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली असलेल्या ८ नंबरच्या खांब्याच्या बाजूला असलेल्या खांबाला धडकून एका पोलो कारचा चुराडा झालेला आढळला. पुढील सीटवरील दोघेही मृतावस्थेत आढळले. मागील सीटवरील खुशवंतची हालचाल सुरु होती. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परिसरातील मेट्रोच्या सीसीटीव्हीची पहाणी केली असतो पोलो कार रुबी हॉल क्लिनिकडून बंडगार्डनच्या दिशेने भरधाव वेगाने येऊन बंडगार्डन मेट्रो स्टेशनच्या खांब्याला आदळलेली दिसते. गाडी पोलला धडकल्यानंतर उलटी फिरली होती. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक देखील दाखल झाले होते. गाडीचा वेग १२० ते १६० च्या जवळपास असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यश आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तर ऋत्विकला एक बहिण आहे. त्यांच्या कुटुंबाला या घटनेने मोठा हादरा बसला आहे. दरम्यान खुशवंतचे वडील रविवारी दुपारनंतर बीडवरून पुण्यात दाखल झाले होते.

--

आईला सांगितले पार्टीला जातोय...यश याने आईला रात्री दहाच्या सुमारास पार्टीला जातोय असे सांगितले होते. मात्र, त्याच्या वडिलांना याची कल्पना नव्हती. जाताना त्याने सोबत ऋत्विकला घेतले. तर खुशंवतला कुठून पिकअप केले गेले हे माहीत पडले नाही. त्यांनी पार्टी कुठे केली, तेथे मद्यपान केले का? तसेच ते बंडगार्डनच्या दिशेने कुठे निघाले होते याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांनी दिली. 

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/733299189777635/}}}}

तरुणांच्या जीवावर बेततेय पार्टी कल्चर...

पोर्शेे कार अपघातानंतर पब आणि पार्टी कल्चर विषय चर्चेला आला. शहरात सातत्याने मद्यधुंद अवस्थेत मध्यरात्री व पहाटे अनेक अपघात घडत आहेत. यामुळे पब आणि रेस्टॉरंट बारवर मध्यंतरी कारवाईचा बडगा उघडला गेला होता, यानंतरही अशा घटना घडत आहेत. रविवारी मध्यरात्री १२ नंतर ड्राय डे लागल्याने हे तीन तरुण पहाटे पाच वाजेपर्यंत कुठे-कुठे फिरत होते याचा तपास पोलिस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Fatal Car Crash in Koregaon Park Claims Two Young Lives

Web Summary : A high-speed car crash in Pune's Koregaon Park killed two young men instantly. The car hit a metro pillar near Bundgarden. Police are investigating the accident, suspected to be caused by speeding and loss of control. Traffic was disrupted.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघात