पुणे : खडकवासला धरणातून जिल्ह्यातील शेतीसाठी उन्हाळी आवर्तन बुधवारपासून (दि. १८) सुरू होणार आहे. हे आवर्तन सुमारे ७० दिवसांचे असणार असून यामध्ये सुमारे सहा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. या आवर्तनामुळे हवेली, दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर या तालुक्यांतील एकूण अडीच लाख हेक्टर क्षेत्राला फायदा होईल. तर ६४ दिवसांच्या रब्बी आवर्तनात सुमारे पावणेचार टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले होते.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!यापूर्वी खडकवासला धरणातून एका आठवड्यापूर्वी अर्थात १० फेब्रुवारी रोजी आवर्तन बंद करण्यात आले होते. हे आवर्तन सुमारे ६४ दिवसांचे होते. यामध्ये प्रामुख्याने पावणेचार टीएमसी इतके पाणी सोडण्यात आले होते. शेतकऱ्यांची मागणी पाहता, तसेच शेतीचे नुकसान होऊ नये, यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खडकवासला धरणातून आवर्तन सोडण्यास मंजुरी दिली. ही मंजुरी कालवा सल्लागार समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून देण्यात आली आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासोबत विखे-पाटील यांनी चर्चा करून हे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे चारशे क्युसेकने बुधवारी सकाळी सहा वाजता हे आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. या आवर्तनामध्ये हवेली, दौंड, बारामती, इंदापूर व पुरंदर या तालुक्यांतील शेतीला सिंचनाचा फायदा होणार असून एकूण २ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होईल. या आवर्तनातच पिण्यासाठीही पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
Web Summary : Khadakwasla dam releases 6 TMC water for 70 days starting Wednesday. Benefit: 2.5 lakh hectares across Haveli, Daund, Baramati, Indapur, and Purandar. Decision made after discussion with ministers.
Web Summary : खडकवासला बांध से बुधवार से 70 दिनों के लिए 6 टीएमसी पानी छोड़ा गया। हवेली, दौंड, बारामती, इंदापुर और पुरंदर में 2.5 लाख हेक्टेयर को लाभ। मंत्रियों के साथ चर्चा के बाद निर्णय।