शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील मंदोशी येथे गॅस स्फोट; घराचे मोठे नुकसान, एक जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 12:58 IST

मंदोशी येथे घरात गॅस स्फोट; पुतण्या गंभीर जखमी, मोठी दुर्घटना टळली

खेड (पुणे जि. ) -  मंदोशी (ता. खेड)  येथील शांताबाई सिताराम गोडे यांच्या घरात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास गॅसचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत त्यांचा पुतण्या लहू तुकाराम गोडे गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री थंडीमुळे शांताबाई गोडे, त्यांची सून जयश्री व नातू आरव घराबाहेर बसले होते. याच वेळी घरातून गॅसचा वास येत असल्याचे लक्षात आल्याने चौकशीसाठी लहू गोडे घरात गेले. मात्र, अचानक मोठा स्फोट होऊन घरात आग पसरली.

स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरातील टी-अँगल असलेल्या छताची फरशी पूर्णपणे फुटली, तसेच वरच्या मजल्यावरील सिमेंट पत्रेही तुटली. वरच्या मजल्यावर दोन भरलेले गॅस सिलेंडर होते; मात्र, सुदैवाने त्यांचा स्फोट झाला नाही. त्या मजल्यावर राहणारे कुटुंब कामानिमित्त कल्याण येथे गेले असल्याने ते अपघातातून बचावले.

घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्परता दाखवत आगीतून सिलेंडर बाहेर काढले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठ अधिकारी व स्थानिक गॅस एजन्सीला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, ‘शिकालो’ गॅस एजन्सीचे मालक नितीन डांगे यांनी अपघातग्रस्त कुटुंबाला संपूर्ण भरपाई देणार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Explosion in Khed Village, House Damaged, One Injured

Web Summary : A gas explosion in Mandoshi, Khed, severely injured one person and caused significant damage to a house. The blast shattered the roof and upper floor. Fortunately, nearby gas cylinders didn't explode. Quick action by villagers prevented further disaster. The gas agency promised full compensation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेfireआगFire Brigadeअग्निशमन दल