शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पवना नदीला पूर: कोथुर्णे पूल पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:15 IST

कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवनानगर बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. परिणामी, दुग्धव्यवसायिक, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना शिवली, ब्राम्हणोली किंवा कडधे मार्गे पवनानगर आणि कामशेतकडे प्रवास करावा लागत आहे

पवनानगर - पवन मावळात गेल्या ४८ तासांपासून अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. पवना धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी शनिवारी  (२६ जुलै ) सकाळी ११ वाजता ७,१४० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी, पवना नदीवरील कोथुर्णे जवळील पूल आणि काले येथील स्वयंभू मंदिर पाण्याखाली गेले आहे.पवना धरणातून सध्या ७,४१० क्युसेक वेगाने पवना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन संनियंत्रण अधिकारी, मध्यवर्ती पुरनियंत्रण कक्ष, पुणे यांनी केले आहे. जोरदार पावसाने ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला असून, अनेक ठिकाणी नागरिकांना मुसळधार पाण्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.या विसर्गामुळे कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवनानगर बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. परिणामी, दुग्धव्यवसायिक, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना शिवली, ब्राम्हणोली किंवा कडधे मार्गे पवनानगर आणि कामशेतकडे प्रवास करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार अडचणीत आले आहेत.धरण प्रशासनाने स्पष्ट केले की, पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने विसर्ग कमी-जास्त होऊ शकतो. त्यामुळे पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना नदीपात्रात उतरू नये, तसेच पाण्याचे पंप, शेती अवजारे आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस