पुणे : जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा व तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी (दि. ८) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर १३ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेसाठीही बुधवारीच प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, अंतिम यादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.
प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबरला जाहीर केली जाईल. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे, आदी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना चुका, प्रभाग बदल, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे, आदी दुरुस्त्या याबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात, तर ७नोव्हेंबरला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती नगर विकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.
१ जुलैपर्यंत पात्र असलेल्या मतदारांना मतदानाची संधीजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही प्रारुप मतदार यादीही बुधवारी (दि. ८) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठीही १ जुलै २०२५ ही अर्हता दिनांक ठरविण्यात आली आहे. अर्थात या दिवसापर्यंत पात्र असलेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. मतदार यादीवरील सूचना व हरकती १४ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येणार असून, त्यावर २६ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबरला गट व गणांनुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यात मतदान केंद्रनिहाय यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
Web Summary : Draft voter lists for ZP and Nagar Parishad elections will be published. Objections can be filed. The final list will be released in October. July 1, 2025 is the qualifying date for voters.
Web Summary : ज़ेडपी और नगर परिषद चुनावों के लिए मसौदा मतदाता सूची प्रकाशित होगी। आपत्तियां दर्ज की जा सकती हैं। अंतिम सूची अक्टूबर में जारी की जाएगी। 1 जुलाई, 2025 मतदाताओं के लिए अहर्ता तिथि है।