शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

वक्फमध्ये हस्तक्षेप करू नका हीच खरी मोदी सौगात; वक्फ बचाव कृती समिती मागणी

By राजू इनामदार | Updated: April 2, 2025 20:48 IST

मुस्लिम समाजाला इदनिमित्त मोदी सौगात वाटप करण्याऐवजी हे वक्फ संशोधन विधेयक मागे घेणे

पुणे: वक्फ संशोधन विधेयक हे मुस्लिम समाजासाठी अन्यायकारक गोष्ट आहे अशी टीका करत वक्फ बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाजाला इदनिमित्त मोदी सौगात वाटप करण्याऐवजी हे वक्फ संशोधन विधेयक मागे घेणे हीच मुस्लिम समाजाला खरी मोदी सौगात ठरेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.वक्फ बचाव कृती समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार, नदीम मुजावर, अजहर तांबोळी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सदस्य मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन, जमीयत ओलेमा हिंद प्रदेश उपाध्यक्ष कारी इद्रिस अन्सारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे डॉ. अमोल देवळेकर, मजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर, अनिस अहमद, आप पक्षाचे युवा उपाध्यक्ष निखिल खंदारे, सोशल डोमेस्टिक पार्टी ऑफ इंडिया शहराध्यक्ष असलम सय्यद, ख्रिश्चन धर्मगुरू बिशप जॉर्ज घोलप, राजन नायर राष्ट्रीय ईसाई महासंघ, भारत जोडो अभियान समन्वयक संदीप बर्वे, श्याम गायकवाड, उत्तम भुजबळ, इत्यादी सामाजिक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.अंजूम इनामदार यांनी सांगितले की वक्फ जमीन दान करण्यामागे आमच्या पूर्वजांचा हेतू होता की या जमिनीतून समाजाचा विकास व्हावा. अनाथ मुलांसाठी, कष्टकरी व गरीब मुस्लिम, बेरोजगार लोक, विधवा महिला या सर्वांचा वक्फ जमिनीमुळे फायदा व्हावा.या जमिनीचा कोणीही सौदा करू शकत नाही व कोणालाही तसा गैरव्यवहार करता येत नाही. या जमिनींची कोणी विल्हेवाट लावत असेल तर ती सहन केली जाणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हे विधेयक मागे घ्यावे अशी मुस्लिम समाजाची मागणी आहे. हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हितासाठी आहे, विकासासाठी आहे, उन्नतीसाठी आहे हे केंद्र सरकारचे सांगणे म्हणजे मुस्लिम समाजाची दिशाभूल करणे आहे अशी टीका अंजूम इनामदार यांनी केली. शिष्टमंडळाच्या वतीने यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हे निवेदन राष्ट्रपतींकडे पोहचवावे अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwaqf board amendment billवक्फ बोर्ड