शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

आमच्या भेटीत कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासंबधीची चर्चा; अजित पवार यांचा खुलासा  

By राजू इनामदार | Updated: March 22, 2025 20:08 IST

एआयचा कृषी क्षेत्रात, ऊस क्षेत्रात वापर करण्यासंबधी जगभर चर्चा सुरू आहे.

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) आमची भेट झाली. मात्र त्यात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (आर्टिफिशल इंटलिजेन्स) वापरासंबधी चर्चा झाली. तिथे अन्य काही जणही उपस्थित होते. राजकीय काहीही नव्हते, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या व्हीएसआयमधील भेटीबद्दल केला. उगीच काहीही बातम्या पसरवू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी पत्रकारांना दिला.व्हीएसआयमध्ये शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी अजित पवार यांची बंद दालनात भेट घेतली. पाटील शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे, त्यामुळे ही भेट समाजमाध्यमांवर व्हायरल झाली.अजित पवार यांनी त्यामुळेच तिथून निघताना पत्रकारांसमोर खुलासा केला. ते म्हणाले, एआयचा कृषी क्षेत्रात, ऊस क्षेत्रात वापर करण्यासंबधी जगभर चर्चा सुरू आहे. हा महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळेच अंदाजपत्रकात मी यासाठी ५०० कोटी रूपयांची स्वतंत्र तरतुद केली आहे. वापरासंबधी काय करता येईल यावर विचार करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. जयंत पाटील या समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे ते चर्चेसाठी म्हणून आले होते. त्यामुळे या भेटीत राजकीय काहीही नाही.औरंगजेबाचा वाद वारंवार उकरून काढला जातो आहे. या विषयीही पवार यांनी थेट नाव न घेता भाजपचे मंत्री निलेश राणे यांच्याविषयी संताप व्यक्त केला. जबाबदार पदांवर काम करणाऱ्या माझ्यासह सर्वांनीच बोलताना भान ठेवायला हवे. माझे मंत्री असतील तर मी त्यांना सांगतो. अन्य कोणाचे मंत्री असे काही प्रक्षोभक बोलत असतील तर त्यांच्या नेत्यांना सांगू, महाराष्ट्रात अनेक थोर व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी असे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस