पुण्यात वक्फ जमीन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी' चौकशी करण्याची मागणी
By अजित घस्ते | Updated: March 30, 2025 11:40 IST2025-03-30T11:40:14+5:302025-03-30T11:40:53+5:30
गरीब आणि गरजू व्यक्तींच्या नावाने बनावट ट्रस्ट तयार करून बेकायदेशीर व्यवहार लपवले गेले

पुण्यात वक्फ जमीन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी' चौकशी करण्याची मागणी
पुणे : वक्फ मालमत्तांची बेकायदेशीर विक्री व करचुकवेगिरी करीत पुण्यात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून, या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि आयकर विभागामार्फत तातडीने चौकशी करावी, तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष सलीम मुल्ला यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी सलीम मुल्ला म्हणाले, गरीब आणि गरजू व्यक्तींच्या नावाने बनावट ट्रस्ट तयार करून बेकायदेशीर व्यवहार लपवले गेले आहेत. उच्च-मूल्य असलेल्या वक्फ जमिनी रिअल इस्टेट व्यावसायिकांना बनावट करारांद्वारे विकल्या गेल्या आहेत. ट्रस्टच्या खात्यांद्वारे मनी लाँड्रिंग झाले असून, वक्फ बोर्डातील काही अधिकाऱ्यांची चौकशी करावी.