शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नवी स्टंटबाजी..! आंद्रा धरणातून गाडी चालवली; पाण्याच्या मधोमध नेऊन धुतली, तरुणांचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:16 IST

जीव धोक्यात घालणारी स्टंटबाजी..! आंद्रा धरणाच्या पाण्यातून टू व्हीलर चालवण्याचा प्रयत्न,व्हिडीओ व्हायरल

पुणे : मावळ तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे आंद्रा धरण सध्या एका धोकादायक प्रकारामुळे चर्चेत आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही स्थानिक तरुणांनी धरणाच्या पाण्यातच थेट मोटरसायकल चालवण्याचा प्रकार केला आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. धरणाच्या अगदी जवळ असलेल्या बांधावरून एक तरुण मोटरसायकल घेऊन थेट पाण्यात उतरतो आणि धोकादायक पद्धतीने चालवतो, असं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.धरणाचे पाणी आणि त्या परिसरातील जमीन निसरडी व खोल असते, त्यामुळे अशा प्रकारची धाडसपूर्ण कृत्यं केवळ स्वतःच्या जीवाला नाही तर इतरांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणारी ठरू शकतात. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाने लक्ष घालून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी होत आहे. तसेच, संबंधित तरुणांवर कारवाईचीही शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलWaterपाणीCrime Newsगुन्हेगारी