-पांडुरंग मरगजेपुणे - धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात असलेल्या चहाच्या दुकानात दूध तापवताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत संतोष हेगडे (वय २० वर्षे) या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारच्या सुमारास दुकानातील कामगार चहा बनवत असताना अचानक स्फोट झाला. यामुळे ग्राहक आणि अन्य कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली. मात्र, संतोष हेगडे दुकानात अडकला. स्फोटानंतर आग भडकली आणि आगीच्या झळा शेजारच्या दोन दुकानांनाही बसल्या, ज्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले.
धनकवडी येथे चहाच्या दुकानात सिलेंडर स्फोट; एका कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 18:42 IST