पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने दहावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६ पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यातील पहिली परीक्षा सक्तीची केली आहे. ती दिलेल्या असेल तरच रिपिटर्स यांना दुसरी परीक्षा देता येणार नाही, असे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दोन-परीक्षा प्रणाली सुरू झाल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिली बोर्ड परीक्षा द्यावीच लागेल. जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत किमान तीन विषय देणार नाहीत, त्यांना 'एसेंशियल रिपीट' श्रेणीत ठेवले जाईल आणि त्यांना पुढील शैक्षणिक वर्षातच मुख्य परीक्षा द्यावी लागेल, असेही बाेर्डाने स्पष्ट केले आहे.
सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी स्पष्ट केले की, सर्वच विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा द्यावी लागणार आहे. जे उत्तीर्ण होतील त्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची परवानगी दिली जाईल. विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा यांसारख्या विषयांसाठी गुण सुधारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. मात्र, जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांना गैरहजर राहतील, ते दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र नसतील. अशा उमेदवारांना 'एसेंशियल रिपीट' श्रेणीत ठेवले जाईल आणि त्यांना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुख्य बोर्ड परीक्षेला बसावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेत कंपार्टमेंट मिळेल, त्यांना कंपार्टमेंट श्रेणीअंतर्गत दुसऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अतिरिक्त विषयांना परवानगी दिली जाणार नाही. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वेगळे विषय घेता येणार नाहीत. जर एखादा विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव मुख्य परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांना गैरहजर राहिला, तर तो सध्याच्या धोरणानुसार दुसऱ्या बोर्ड परीक्षेला बसू शकत नाही. या नियमांत सवलत देण्याच्या विनंत्यांचा विचार केला जाणार नाही, असेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची पहिली परीक्षा देणे अनिवार्यच असणार आहे.
Web Summary : From 2026, CBSE Class 10 exams will be held twice yearly. The first exam is mandatory; repeaters can't skip it. Failing three subjects in the first attempt leads to 'Essential Repeat' status, requiring retaking the main exam next year. No extra subjects allowed after passing.
Web Summary : 2026 से, सीबीएसई दसवीं की परीक्षा साल में दो बार होगी। पहली परीक्षा अनिवार्य है; रिपीटर्स इसे छोड़ नहीं सकते। पहली बार में तीन विषयों में फेल होने पर 'एसेंशियल रिपीट' स्टेटस मिलेगा, जिससे अगले साल मुख्य परीक्षा फिर से देनी होगी। उत्तीर्ण होने के बाद अतिरिक्त विषयों की अनुमति नहीं।