शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
4
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
5
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
6
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
7
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
8
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
9
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
10
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
11
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
12
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
13
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
14
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
15
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
18
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
19
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
20
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

दीपक मानकरांच्या मुलासह व्याह्यावर गुन्हा दाखल;बनावट दस्त बनवून सादर करणे भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:14 IST

करण मानकरचा सासरा सुखेन शहा याने जबाबात मुलगा सिद्धांत हा मुळशी येथे १० एकरवर रिसॉर्ट तयार करणार होता.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरोधात दोन आठवड्यांपूर्वी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचे भासवून सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर आता त्यांचा मुलगा करण मानकर आणि व्याही सुखेन सुरेशचंद्र शहा यांच्यावरही समर्थ पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी, समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका गुन्ह्यात शंतनू सॅम्यूअल कुकडे, सुखेन सुरेशचंद्र शहा, रौनक भरत जैन आणि इतर, तर दुसऱ्या गुन्ह्यात शंतनु सॅम्युअल कुकडे, करण दीपक मानकर आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याच्यावर गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत कुकडे याच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्या बँक खात्यात तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. कुकडेच्या बँक खात्यातून मानकर पिता-पुत्रांच्या बँक खात्यात तब्बल पावणेदोन कोटी रुपये वर्ग झाले होते, तर करण याचा सासरा सुखेन शहा याच्या बँक खात्यात तब्बल सहा कोटी ५२ लाख वर्ग झाले आहेत. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांची चौकशी सुरू होती. दीपक मानकर यांनी कुकडेसोबत जमीन खरेदीच्या अनुषंगाने आर्थिक व्यवहार झाले नसल्याचे सांगत कागदपत्रे सादर केली होती. पोलिसांनी कागदपत्रांची सत्यता तपासली असता, संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, बलात्कारातील आरोपी शंतनू कुकडेसोबतचे असलेले आर्थिक व्यवहार लपवल्याप्रकरणी आणि पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, गुरुवारी (दि. २९) दाखल झालेल्या गुन्ह्यात करण मानकर याने जबाबात, आपण डोणजे येथे २०२४ मध्ये दुग्ध व्यवसाय सुरू करणार होतो. तेव्हा शंतनू कुकडे हा पाच कोटी रुपये कर्ज स्वरूपात मदत देणार होता. हे कर्ज ४० वर्षांसाठी देण्यात येणार होते. त्यासाठी करारनामा दोघांच्या संमतीने केला असून, त्यातील ५० लाख कुकडेने वर्ग केल्याचे सांगितले होते. मात्र, तपासात बनावट दस्त बनवून ते खरे असल्याचे भासविल्याचे उघड झाले.

दुसरीकडे, करण मानकरचा सासरा सुखेन शहा याने जबाबात मुलगा सिद्धांत हा मुळशी येथे १० एकरवर रिसॉर्ट तयार करणार होता. त्या रिसॉर्टमध्ये गुंतवणूक म्हणून शंतनू कुकडेने ५ कोटी २२ लाख आणि रौनक जैन याने १ कोटी ३० लाख रुपये पाठवल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी स्टँप पेपरवर केलेला करारनामा सादर केला होता. मात्र, तपासणीत त्यांनीही बनावट दस्त बनविल्याचे आढळले. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस आयुक्त अमितेश कुमार स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेस