शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसची मिटिंग सुरु असतानाच बिस्कीट खाणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला 'बॉस'ने केला 'असा' मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:44 IST

मॅनेजरसोबत घडलेला असाच एक किस्सा पुण्यातील धिमाही जैन यांनी 'एक्स'वर शेअर केला आहे. त्याचं झालं असं की..

पुणे - ऑफिस म्हंटलं की काम आलंच. मात्र कामासोबतच ऑफिसमध्ये अनेकदा मजेशीर किस्से देखील घडत असतात. असे भन्नाट किस्से सोशल मीडियाच्या चावडीवर शेअर केले जातात.  कामाच्या व्यापातून वेळ काढत अशा किस्स्यांवर मग गप्पांचे फड रंगतात.

मॅनेजरसोबत घडलेला असाच एक किस्सा पुण्यातील धिमाही जैन यांनी 'एक्स'वर शेअर केला आहे. त्याचं झालं असं की,  धिमाही काम करत असलेल्या कंपनीची एक ऑनलाईन मिटिंग सुरु होती. मिटिंग ऑनलाईन असल्याने  धिमाही  यांनी, मिटिंग सुरु असताना बिस्किटाचा आस्वाद घ्यावा असा विचार केला. 

बिस्कीट खात असतानाच  धिमाही यांना, त्यांच्या मॅनेजरचा एक मेसेज आला. हा मेसेज वाचून त्यांनाही हसू आवरलं नाही. मॅनेजर साहेबांनी लिहलेलं,   धिमाही तुझा स्पीकर चालू असून तू बिस्कीट खाताना अख्ख्या मीटिंगमध्ये कुरुम-कुरुम आवाज येतोय. तुझा स्पीकर बंद कर. या मेसेजचा स्क्रिनशॉट धिमाही यांनी एक्स पोस्टद्वारे शेअर केला आहे. धिमाही यांच्या पोस्टवर कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गप्पांचा फड रंगवला आहे. असे हलके फुलके क्षण कामाचा ताणतणाव कमी करून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा देतात, अशा प्रतिक्रिया काहींनी नोंदवल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रViral Photosव्हायरल फोटोज्Social Mediaसोशल मीडिया