शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Bhimashankar temple:भाविकांसाठी बंद असलेले भीमाशंकर मंदिर भाजप खासदार निशिकांत दुबेंसाठी खुले ? प्रशासनावर दुजाभावाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:47 IST

मंदिर बंद असल्यामुळे हजारो किलोमीटर पायी व सायकलवारी करत येणाऱ्या भाविकांना दर्शन न घेता परत जावे लागत आहे.

पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील पवित्र श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद आहे. मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या काळातच भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना व्हीआयपी दर्शन देण्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याचा आरोप होत असून यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मंदिर बंद असल्यामुळे हजारो किलोमीटर पायी व सायकलवारी करत येणाऱ्या भाविकांना दर्शन न घेता परत जावे लागत आहे. तप-अनुष्ठान करून येणाऱ्या भाविकांनाही मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरने आलेल्या खासदारांसाठी मंदिर उघडण्यात आल्याचे समोर आल्यानंतर सामान्य भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. भाविकांच्या मते, मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून सर्वसामान्यांना कठोर नियम लागू केले जात असताना राजकीय नेत्यांसाठी वेगळे नियम लागू केले जातात का, असा सवाल उपस्थित होत आहे. महादेवाच्या मंदिरात असा दुजाभाव का? असा प्रश्नही भाविक विचारत आहेत.विशेष म्हणजे, पवित्र महाशिवरात्री निमित्त आठ दिवस मंदिर खुले करण्याची घोषणा प्रशासनाने यापूर्वी केली होती. मात्र मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे त्या दिवशीही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाविकांनी हा निर्णय मोठ्या मनाने स्वीकारला होता. परंतु एका व्हीआयपी व्यक्तीसाठी मंदिर उघडल्याच्या आरोपांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, झारखंडमधील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार असलेले डॉ. निशिकांत दुबे हे पक्षातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या भेटीदरम्यान मंदिर उघडण्यात आले असल्याची चर्चा सुरू असून याबाबत चौकशीची मागणी होत आहे.

या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,'भीमाशंकर मंदिर सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामामुळे ९ जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी बंद आहे. या कालावधीत दर्शनासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. खासदारांनी दर्शन घेतल्याबाबत मला कोणतीही माहिती नाही. जिल्हा प्रशासनाकडून अशी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबत चौकशी करून माहिती देतो.' सध्या या प्रकरणामुळे भीमाशंकर परिसरात चर्चा रंगली असून मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनावर भाविकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhimashankar temple row: VIP access sparks outrage amid closure.

Web Summary : Bhimashankar temple's closure for renovations faces scrutiny after allegations that a BJP MP received special access. This preferential treatment has triggered anger among devotees, questioning administrative fairness. District officials have denied granting permission and promised investigation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBhimashankarभीमाशंकरPuneपुणेBJPभाजपा