शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चौफुला कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी आणखी एकाला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 09:31 IST

- ‘लोकमत’च्या दणक्यानंतर पोलिसांची कारवाई: गाेळी कोणी चालवली हे अस्पष्टच

पुणे: दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणात आरोपीची आदलाबदल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ जुलैला प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पोलिसांनी धावपळ करत अखेर या गेाळीबारप्रकरणी आणखी मारूंजीचे माजी उपसरपंच हिरामण ऊर्फ काळू युवराज बुचडे (रा. मारुजी) यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.

न्यू अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबार तब्बल ३६ तासांनंतर समाजमाध्यमांच्या रेट्यामुळे पोलिसांना उघड करावा लागला. यामध्ये आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह गणपत जगताप, चंद्रकांत मारणे, रघुनाथ आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये एका आरोपीची अदलाबदल केल्याची चर्चा सुरु झाली होती. तरीही पोलिस यामध्ये केवळ चारच आरोपी असल्यावर ठाम होते. ‘लोकमत’ने गोळीबाराचा तपास संशायाच्या भोवऱ्यात असे वृत्त २७ जुलैला प्रसिद्ध केले. अन् पोलिसांची धावपळ सुरू झाली. प्रकरण मिटवण्यासाठी दबावतंत्राचा अजूनही वापर सुरू आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर यवत पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) पहाटे हिरामन बुचडे यांना मारूंजी येथून ताब्यात घेतले आहे. पूर्वी यामध्ये केवळ चौघांचाच समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. परंतु, पोलिसांची लपवाछपवी फार काळ काही टिकली नाही. अखेर बुचडे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

कला केंद्रात गोळीबार नेमका कोणी केला हेही अद्यापर्यंत पोलिसांनी स्पष्ट सांगितलेले नाही. तपास सुरू असल्याचे कारण देत चालढकल करण्याचा प्रकार सुरू आहे. काहीजण म्हणतात बाळासाहेब मांडेकर यांनी गोळीबार केला तर गणतप जगताप म्हणतो मी गोळी चालवली तर पोलिस म्हणतात एवढेच आरोपी आहेत. यामुळे हे संपूर्ण प्रकरण आणि तपास संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

ती दुसरी फॉर्च्युनर कोणाचीन्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणाची माहिती अद्यापही स्पष्टपणे समोर आली नाही. रोज नवीन माहिती समोर येत आहे. भांडाभोड झाल्यानंतर पोलिसांनी बुचडेला ताब्यात घेतले. त्यानंतर या संशयितांनी वापरलेले वाहनदेखील जप्त केले. मात्र, त्या ठिकाणी अजून एक फॉर्च्युनर असल्याची चर्चा सुरू आहे. ती काेणाची आहे याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असेल की नाही याबाबत साशंकताच व्यक्त होत आहे. कारण आधीच एका संशयिताला अभय तसेच कला केंद्राला अभय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात आता ही नवी फॉर्च्युनर यामुळे संपूर्ण तपासच चक्रावणारा ठरत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी