शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

नारायणगावात १०.२७५ किलो गांजासह आरोपीस अटक, १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 20:13 IST

संशयिताला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्या मोटारसायकलच्या मागील बाजूस पोत्यात भरलेला १०.२७५ किलो गांजा आढळला.

नारायणगाव : नारायणगाव-मांजरवाडी रोडवर मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी जात असलेल्या आरोपीस पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून १,०२,५०० रुपये किमतीचा १०.२७५ किलो गांजा आणि दुचाकी असा एकूण १,३२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

अटक करण्यात आलेला आरोपी मुनवर अली सय्यद (वय ४८, रा. कोतुळ, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) असून, त्याला नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक फौजदार दीपक साबळे, हवालदार संदीप वारे आणि अक्षय नवले हे जुन्नर विभागात गस्त घालत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुनवर सय्यद हा मोटारसायकलवरून नारायणगाव-मांजरवाडी रोडवर गांजा विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पथकाने नारायणगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांसह सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्या मोटारसायकलच्या मागील बाजूस पोत्यात भरलेला १०.२७५ किलो गांजा आढळला. गांजा आणि मोटारसायकल असा एकूण १,३२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, तसेच नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, दडस पाटील, मंगेश लोखंडे, सोमनाथ डोके आणि सत्यम केळकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी