शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार अचानक पेटली; पाटसजवळ कार जळून खाक,दोघे प्रवासी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 20:29 IST

- पाटस-दौंड रस्त्यावर पाटसकडून दौंडकडे जात असलेल्या कारने गार फाट्याच्या जवळ पेट घेतला.

पाटस (ता. दौंड): पाटस–दौंड मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या कारला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पाटसकडून दौंडकडे जाणारी कार गार फाट्याजवळ पोहोचताच अचानक धुराचे लोट निघू लागले आणि क्षणात गाडीने पेट घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गाडीत असलेले दोघे प्रवासी तात्काळ खाली उतरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

 

 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी धाव घेत गाडीवरील आग विझवण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा सतत मारा केल्याने आग नियंत्रणात आली. घटनास्थळापासून काही अंतरावर पेट्रोल पंप असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता होती; मात्र वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे पाटस–दौंड रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, कारला आग लागण्यामागे शॉर्टसर्किट कारणीभूत असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Speeding Car Bursts into Flames Near Patas; Passengers Escape Unhurt

Web Summary : A speeding car caught fire near Patas, but both passengers escaped unharmed. The car was completely destroyed. Locals helped extinguish the blaze, preventing a potential disaster near a nearby petrol pump. Traffic was briefly disrupted; a short circuit is suspected as the cause.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेfireआगMaharashtraमहाराष्ट्र