शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील न्यायालयांत प्रलंबित दाव्यांचा डोंगर; तब्बल ५७ लाख ६४ हजार १०७ दावे प्रतीक्षेत

By नम्रता फडणीस | Updated: July 18, 2025 09:31 IST

- फौजदारी दाव्यांचे प्रमाण अधिक; सरकारी वकिलांची संख्या कमी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे

पुणे : सरकारी वकिलांच्या तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या, कोर्ट पैरवी, हवालदार यांचे अपुरे मनुष्यबळ, तसेच आरोपी फरार असणे, कागदपत्रांची प्रतीक्षा, साक्षीदार फितूर होणे, आरोपींचे रेकॉर्ड उपलब्ध नसणे अशा अनेक कारणांमुळे राज्यातील जिल्हा, सत्र आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये तब्बल ५७ लाख ६४ हजार १०७ दावे प्रलंबित असून, यात ४० लाख १६ हजार १८५ फौजदारी आणि १७ लाख ५३ हजार ९२ दिवाणी दाव्यांचा समावेश आहे. पुणे जिल्हा न्यायालयांमध्ये ७ लाख ७७ हजार ५९७ दावे प्रलंबित असून, फौजदारी दाव्यांचे प्रमाण ८५ टक्के इतके आहे.

प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी राज्यातील सर्वच न्यायालयांना सुविधा आणि साधने मिळावीत, यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिका देखील प्रलंबित आहेत. जिल्ह्यांमध्ये जलदगतीने न्यायालय सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारांकडून वारंवार केली जाते. मात्र, या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. महिला व मुलींवरील अत्याचाराच्या केसेस चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन झालेली नाहीत. त्यामुळे हे दावे प्रलंबितच आहेत.

पुणे जिल्ह्यात ५ लाख ९१ हजार २६० फौजदारी दावे, तर १ लाख ८६ हजार २३७ दिवाणी दावे प्रलंबित आहेत. दरमहिना दाव्यांची संख्या वाढत आहे. पुणे जिल्ह्याच्या न्यायालयांमध्ये गेल्या महिन्यात ३४ हजार १३५ इतके दावे दाखल झाले. त्यात फौजदारी दाव्यांची संख्या ३१ हजार ९६५ इतकी असून, २१७० दिवाणी दाव्यांची संख्या आहे. यात एकूण ५७५२ इतकेच दावे निकाली काढण्यात आले आहेत. नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीडच्या आकडेवारीमध्ये ही प्रलंबित दाव्यांची माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

राज्यात फौजदारी दावे प्रलंबित असण्याची कारणे आणि प्रकरणांची संख्या

कारणे ---------------------- दाव्यांची संख्या

१) आरोपी फरार ......... ........ ...... २,२४,४७०

२) कागदपत्रांची प्रतीक्षा --------- ५१,८२८

३) काही कारणांसाठी स्थगिती -------- ५१,१९४

४) साक्षीदार -------------------- ४०९५

५) रेकॉर्ड अनुपलब्ध ------------ ३०३०

६) उच्च न्यायालयात स्थगिती --------- ८९३१

७) जिल्हा न्यायालयात स्थगिती -------- १३९३

न्यायालयात फौजदारी प्रकरणे चालविण्यासाठी समन्स, वाॅरंट पाठविण्यासाठी कोर्ट पैरवी, हवालदार यांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे फिर्यादी व साक्षीदार यांना न्यायालयात योग्य वेळेत हजर केले जात नाही. यामुळे या प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होत नाही. याशिवाय सरकारी वकिलांची तीन वर्षांनी बदली होत असल्याने खटला योग्य वेळेत चालत नाही. या कारणांमुळे फौजदारी प्रकरणात प्रलंबित दाव्यांची संख्या वाढत आहे. - ॲड. राकेश सोनार, फौजदारी वकील

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय