शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

जलसंपदाच्या निविदेची होळी, जलसंपदा राज्यमंत्र्यांनी फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 00:35 IST

गुंजवणीच्या बंद जलवाहिनीच्या कामाची निविदा काढून भोर, वेल्हा व हवेली तालुक्यातील योजनांचा उल्लेख करणे टाळल्याने या तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नसरापूर -  गुंजवणीच्या बंद जलवाहिनीच्या कामाची निविदा काढून भोर, वेल्हा व हवेली तालुक्यातील योजनांचा उल्लेख करणे टाळल्याने या तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामुळे जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या निविदेची गुंजवणी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कापूरहोळ (ता.भोर) येथे होळी करण्यात आली. या वेळी शेतकºयांनी शासनाच्या विरोधी घोषणा दिल्या.गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या चर्चेच्या वेळी माननीय मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आदी अधिकाºयांनी गुंजवणीच्या सर्वच योजनांची निविदाही एकाच वेळी काढल्या जातील, असा शब्द दिला होता; मात्र नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निविदेच्या माध्यमातून फक्त आणि फक्त पुरंदर उपसा सिंचन योजनेची जवळपास १ हजार १६ कोटी रुपयांच्या निविदेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या चाललेल्या दडपशाहीचा भोर, वेल्हा व हवेली गुंजवणी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत, असे सर्व पक्षीय पदाधिकाºयांच्या वतीने आमदार संग्राम थोपटे यांनी कडक शब्दांत निषेध नोंदविला.कापूरव्होळ (ता.भोर) येथे गुंजवणी संघर्ष समितीच्या सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी या घटनेचा निषेध करीत जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या निविदेची होळी केली. या वेळी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह गुंजवणी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, शिवसेनेचे वेल्हा तालुकाध्यक्ष शैलेश वालगुडे, काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, रोहन बाठे, दिलीप बाठे, राष्ट्रवादीचे वेल्हा तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, माजी उपसभापती लहू शेलार, सुधीर रेणुसे, मनसेचे दिगंबर चोरगे, विलास बोरगे,भाजपाचे हवेली तालुकाध्यक्ष दीपक रजपूत, विश्वास ननावरे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे भोर तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड, बळीराजा संघटनेचे राजेंद्र कोंडे , सचिव अरविंद सोंडकर, संपतराव अंबवले, संदीप चक्के, मदन खुटवड, गणेश शिळीमकर, राजाराम गिरंजे, विठ्ठल गायकवाड, विष्णू जुगधर, आनंदा रसाळ, अनिरुद्ध यादव आदी सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जलसंपदा विभागाने दिलेला शब्द जर पाळत नसेल, तर त्यांना भोर व वेल्हा तालुक्यातील जनता येथील एकही दगडही गुंजवणी संघर्ष समिती हलवू देणार नाही, असा आमचा निर्धार झालेला आहे.- संग्राम थोपटे आमदारशेतक-यांमध्ये असंतोष...1भोर, वेल्हा, हवेलीतील तालुक्यातील वांगणी, वाजेघर व शिवगंगा खोरे या योजनेबाबतची मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील, असा विश्वास संघर्ष समितीला होता. परंतु, गुंजवणी धरणाच्या बंद पाईपलाईन कामाच्या निविदेसंबंधित जलसंपदा मंत्री यांनी प्रसिद्ध केलेल्या निविदेमुळे शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे.2पुरंदर सिंचन योजना व्हावी, याकरिता आम्ही सकारात्मकच राहिलो आहोतस, असे असताना जलसंपदा मंत्री यांनी उचललेले पाऊल भोर, वेल्ह्याकरिता धक्कादायक आहे. पुरंदर तालुक्यातील ही योजना आणि इतर योजनांबरोबरच भोर, वेल्हा व हवेलीतील तत्त्वत: मान्यता दिलेल्या योजना यांचे एकत्रित कामाच्या निविदा निघाव्या, असे संघर्ष समितीचे मत आहे. पुरंदर तालुक्यातील बंद पाईप योजनेबरोबरच भोर, वेल्हा व हवेली तालुक्यातील संघर्ष समितीने सुचविलेल्या योजनांचे एकत्रित निविदा निघाव्या, अशी मागणी असतानाही जलसंपदामंत्र्यांनी शेतकºयांची तीव्र नाराजी ओढवून घेतली आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी