शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'महारेरा'च्या दणक्याने बंद पडलेले ३६९९ बांधकाम प्रकल्प झाले पूर्ण..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 07:36 IST

भोगवटा प्रमाणपत्राची सत्यता पडताळणीबाबत महानगरपालिका, नगरपालिकांना महारेराचे पत्र; भोगवटा प्रमाणपत्रांची पडताळणी करून दहा दिवसांमध्ये अहवाल द्यावा लागणार  

पुणे : महारेराने राज्यातील बंद पडलेल्या (व्यपगत अर्थात लॅपस्ड) बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजावली होती. परिणामी ३ हजार ६९९ प्रकल्प पूर्ण झाल्याचे व्यावसायिकांनी महारेराला कळविले आहे. या प्रकल्पांना संबंधित महापालिका आणि नगरपालिकांनी भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. ही प्रमाणपत्रे योग्य असल्याची तपासणी करून त्याचा अहवाल महारेराकडे १० दिवसांत द्यावा, अशी सूचना महारेराने केली आहे.

या कालावधीत प्राधिकरणांकडून प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित प्रकल्पांचे भोगवटा प्रमाणपत्र खरे आहे, असे गृहीत धरून प्रकल्प पूर्ण झाल्याची प्रक्रिया महारेरा सुरू करणार आहे. त्यानंतर भोगवटा प्रमाणपत्राबाबत वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील, असा इशारा महारेराने दिला आहे. पुणे विभागातील अशा १ हजार २२३ प्रकल्पांचा समावेश असून, पुणे जिल्ह्यातील १ हजार ४५ प्रकल्प आहेत.

महारेराने बंद पडलेल्या (व्यपगत) प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसीला प्रतिसाद म्हणून ३ हजार ६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले असून, त्यांना संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून मिळालेले भोगवटा प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड केल्याचेकळविले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील गृहनिर्माण प्रकल्पातील फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सर्व भोगवटा प्रमाणपत्रे महारेराने संबंधित प्राधिकरणांकडून प्रमाणित करून घेण्याचे ठरविण्यात आलेले आहे.

प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड होणारप्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाला काही अटींनुसार सदनिका विक्रीसाठी महारेराकडे प्रकल्पाची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे, तसेच प्रकल्प उभारणीच्या काळातत्रैमासिक प्रगती अहवाल, वार्षिक अहवाल सादर करावे लागतात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्राधिकरणाचे भोगवटा प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.हे भोगवटा प्रमाणपत्र महारेराने स्वीकारले की संबंधित प्रवर्तकाला त्या२ प्रवर्तकाच्या खात्यातील सर्व पैसे काढण्याचे स्वातंत्र्य असते. शिवाय त्यांना त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने कुठलीही विवरणपत्रे भरावी लागत नाहीत.

असे आहेत प्रकल्पपुणे क्षेत्र -१२२३पुणे - १०१५, कोल्हापूर- ४९, सांगली -५५, सातारा- ६९, सोलापूर- ३५.मुंबई महाप्रदेश क्षेत्र- १८१९मुंबई शहर- १०६, मुंबई उपनगर- ४३०, पालघर- १७५ रायगड- ४१५, रत्नागिरी-८६, सिंधुदुर्ग- ५०, ठाणे- ५५७.नाशिक क्षेत्र - २७३नाशिक- २२६, अहिल्यानगर- २३, धुळे-३, जळगाव- १९, नंदुरबार- २.संभाजीनगर क्षेत्र- १३२संभाजीनगर- १०१, बीड-३, जालना- ९, लातूर- १०, नांदेड- ५, धाराशीव - ३,परभणी- १.अमरावती क्षेत्र- ८४अमरावती - ४८, अकोला- १५, बुलडाणा - ७, वर्धा- ८, वाशिम- १, यवतमाळ - ५,नागपूर क्षेत्र -१६८नागपूर- १४४, भंडारा- १, चंद्रपूर- २२, गडचिरोली - १. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडReal Estateबांधकाम उद्योग