शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुणे परिमंडलात १० लाख स्मार्ट वीज मीटर बसविले, सात महिन्यांत पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:37 IST

पुणे परिमंडलात १० लाख स्मार्ट वीज मीटर बसविले, सात महिन्यांत पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे : महावितरण पुणे परिमंडलात वीज ग्राहकांची संख्या ३९ लाख ७१ हजार इतकी असून, त्यापैकी ९ लाख ८४ हजार ग्राहकांना अत्याधुनिक टीओडी वीज मीटर बसविण्यात आले आहेत. या ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातील दिवसा वीजवापरावर ८० पैसे प्रतियुनिट सवलत दिली जात असून, या सवलतीपोटी गेल्या सात महिन्यांत (जुलै २०२५ ते जानेवारी २०२६) पुणेकरांना ८ कोटी ६० लाखांचा लाभ मिळाला आहे. हे मीटर मोफत बसविले जात असून, ग्राहकांनी मीटर बसविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.

महावितरणला लागणाऱ्या विजेत दिवसेंदिवस सौरऊर्जेचा वाटा वाढत आहे. ही वीज दिवसा मिळत असून, इतर विजेच्या तुलनेत स्वस्त आहे. या स्वस्त विजेचा फायदा महावितरण ग्राहकांना आकारल्या जाणाऱ्या वीज दरावर प्रतियुनिट ८० पैसे प्रमाणे देते. पुढील काळात ही सवलत १ रुपया प्रतियुनिटपर्यंत जाणार आहे. या सवलतीसाठी ग्राहकाकडे टीओडी मीटर असणे आवश्यक आहे. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पुणे परिमंडलात गणेशखिंड शहर मंडल, रास्तापेठ शहर मंडल व पुणे ग्रामीण मंडल अशी तीन प्रमुख कार्यालये आहेत. त्यापैकी गणेशखिंड शहर मंडलात ३ लाख ६६ हजार ८६७ टीओडी मीटर आहेत. रास्ता पेठ शहर मंडल दुसऱ्या क्रमांकावर असून, या मंडलात ३ लाख ६३ हजार ७४२ टीओडी मीटर ग्राहक आहेत. तर पुणे ग्रामीण मंडलामध्ये २ लाख ५४ हजार ३५३ टीओडी मीटर/ग्राहक आहेत. या मंडलांतील टीओडी मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना सात महिन्यांमध्ये अनुक्रमे गणेशखिंड- ३ कोटी ६९ लाख ३४ हजार २ रुपये, रास्तापेठ- ३ कोटी ५३ लाख ६२ हजार ६५९ रुपये, तर पुणे ग्रामीण- १ कोटी ३७ लाख ७५ हजार ५६० रुपये सवलत मिळाली आहे.

मंडल एकूण ग्राहक टीओडी ग्राहक सवलत (रुपये)

गणेशखिंड शहर मंडल १४७२२२३ - ३६६८६७ - ३,६९,३४,०७२

रास्तापेठ शहर मंडल १५०३२२५- ३६३७४२- ३,५३,६२,६५९

पुणे ग्रामीण मंडल ९९६४१५- २५४३५३- १,३७,७५,५६०

पुणे परिमंडल एकूण ३९७१८६३- ९८४९६२- ८,६०,७२,२९१  

काही ठिकाणी नवीन मीटरचे फायदे समजून न घेता ते बसविण्यापूर्वीच विरोध केला जात आहे. विजेचे बिल जास्त येत नाही तर ते अचूक असेल. ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये. मीटर बसविण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. -  सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Achieves 1 Million Smart Meters, Offers ₹8.6 Cr Discount.

Web Summary : Pune installs a million smart meters, granting ₹8.6 crore discount in seven months. Customers with TOD meters save ₹0.80/unit during daytime. More savings are coming; cooperation urged.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रbillबिल