शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला पसंती! माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 7:16 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा आमदार चेतन तुपे यांनी राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच जणांनी या पदासाठी फिल्डिंग लावली होती.

पुणे: पुणेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा आमदार चेतन तुपे यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार व अजित पवार नेमकी कुणाच्या हाती पक्षाची धुरा देतात याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते.अखेर माजी महापौर प्रशांत जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जगताप यांच्या नियुक्तीची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.

आगामी काळात होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशांत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना मोठी जबाबदारी सोपविली आहे. जगताप यांनी महापौर, पीएमपीएल संचालक असे अनेक पदे भूषविली आहे. पुणे महापालिकेत जवळपास २१ वर्षांपासून त्यांना पालिकेतील कामाचा अनुभव आहे. २०१२ साली ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. २०१६ ते २०१७ या कालावधी दरम्यान ते त्यांनी पुण्याचे महापौर पदाचा कार्यभार सांभाळला.सध्या ते पक्षाचे विद्यमान नगरसेवक आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात त्यांची हातोटी आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध देखील आहे. सुप्रिया सुळे यांचे जवळचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदासाठी दीपक मानकर, दत्ता धनकवडे,सचिन दोडके यांसारखी बऱ्याच नावांची चर्चा सुरू होती. मात्र अखेर पक्षाने महापालिकेतील सुसंस्कृत चेहरा व मन मिळाऊ स्वभाव असलेल्या  नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या नावाला पसंती दिली.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे