शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पुणे महापालिका मोजते श्वानांची संख्या ‘अंदाजे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 13:49 IST

आकड्याबाबत साशंकता : शहरात दोन ते अडीच लाख श्वान असल्याचा दावा

ठळक मुद्देदरवर्षी पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आरोग्य विभागासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद व्हेटर्नरी विभागाकडून श्वानांच्या नसबंदीचे केले जाते काम गेल्या वर्षभरात श्वानदंशाच्या दहा हजार घटना भुलीचे औषध आणि लसींची उपलब्धताही कमी

पुणे : शहरात भटक्या श्वानांनी उच्छाद मांडलेला असून श्वानदंशाच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. श्वानांचे प्रजनन रोखण्याकरिता पालिकेकडून त्यांची नसबंदी केली जाते. शहरात दोन ते अडीच लाख भटके श्वान असल्याचा आकडा पालिकेकडून सांगितला जात आहे. परंतु, हा आकडा केवळ ‘अंदाजा’च्या आधारावर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या आकड्यांबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. दरवर्षी पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आरोग्य विभागासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. आरोग्य विभागांतर्गत येत असलेल्या व्हेटर्नरी विभागाकडून श्वानांच्या नसबंदीचे काम केले जाते. पालिकेकडे श्वानांना या नसबंदीकरिता दिल्या जाणाऱ्या भूलीच्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. वर्षाकाठी हजारोंच्या संख्येत श्वानदंशाच्या घटना घडतात. नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना भीतीच्या छायेखाली रस्त्यांवरून जावे लागत आहे. दुचाकीचालकांच्या तर अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढल्याने किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत. श्वानांना चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनचालक गंभीररीत्या जखमी झाल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. गेल्या वर्षभरात श्वानदंशाच्या दहा हजार घटना घडल्या आहेत. आतापर्यंत ७५ हजार श्वानांची नसबंदी करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तरीदेखील श्वानांची शहरातील संख्या कमी होताना दिसत नाही. मुळातच श्वानांच्या नसबंदी केंद्राची क्षमता कमी आहे. त्यातच भुलीचे औषध आणि लसींची उपलब्धताही कमी आहे. पालिकेकडून शहरात एक ते दीड लाख श्वान असावेत आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील एक लाख श्वान असे एकूण दोन ते अडीच लाख श्वान शहरात असल्याचे सांगितले जात आहे.  ......श्वानांची संख्या कमी न होण्यामागे निकृष्ट दर्जाच्या औषधांचा वापर, श्वानांच्या नसबंदीकडे होणारे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे. शहरात सर्वत्र श्वानांच्या टोळ्या फिरताना दिसतात. नागरिक त्रस्त झालेले असताना पालिकेला मात्र हे श्वान सापडत नाहीत. श्वान पकडायला जाणारे वाहन येताच त्याच्या वासाने श्वान पसार होतात असे कारण दिले जाते. .......पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये श्वानांच्या नसबंदी शस्त्रक्रियेकरिता दोन ते अडीच कोटींची तरतूद करण्यात येते. यातील सर्वच निधी खर्च होत नाही. गेल्या तीन वर्षांत ३३ हजार श्वानांची नसबंदी करण्यात आली आहे............

2शहरात डॉ. नायडू रुग्णालयात २० ते २५ श्वानांची तर केशवनगर-मुंढवा येथे ५५-६० श्वानांच्या शस्त्रक्रियेची सुविधा आहे. ही क्षमता वाढविण्याची गरज आहे. ....श्वान नसबंदीची आकडेवारी.....वर्ष    नसबंदी२०१६-१७    ९७०२२०१७-१८    ११,७०७२०१८-१९    ११,९०९.....श्वानदंशाची आकडेवारी२०१६-१७ : १७, ८२८२०१७-१८ : १०, ३४० २०१८-१९ : ९,९७२

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdogकुत्राhospitalहॉस्पिटल