शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

पुणे महापालिका निवडणुका: डोहाळ जेवणालाच घातलं जातंय बारसं! ऑनलाइन निवडणकीचा नुसता धुरळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 12:53 IST

सध्या सोशल मीडियावर कोण होणार नगरसेवक, याची मोठी धूम सुरू आहे...

पांडुरंग मरगजे

धनकवडी : हल्ली मोठ्या हाॅलमध्ये मोठा खर्च करून कंत्राटी पद्धतीचे डोहाळ जेवण केलं जातं. त्यामध्ये भावी आई-बाबांना 'इट्स बाॅय' किंवा 'इट्स गर्ल' अशी निवड करायची असते. आगोदर ठरल्याप्रमाणे हे भावी आई-बाबा ' इट्स बाॅय' या पर्यायाचीच निवड करतात. हल्ली सोशल मीडियावरसुद्धा हेच पहायला मिळतं. नगरसेवक होण्या अगोदरच सारं काही सेटिंग करून चाललेलं एक नाटक ( खरे तर नौटंकी) उत्तम प्रकारे सुरू आहे. त्यामुळे ऑनलाइन निवडणूकीचा नुसताच फाssर्स, डोहाळ जेवणालाच घातलं जातंय बारसं, असं म्हटल्याशिवाय रहावत नाही.

सध्या सोशल मीडियावर कोण होणार नगरसेवक, याची मोठी धूम सुरू आहे. आपली पहिली पसंती कोणाला? कोण निवडून येणार? पुरुष/महिला गटातून कोण उमेदवार असणार? असे एक ना अनेक प्रश्‍नांचे सध्या शहरासह दक्षिण उपनगरात ऑनलाइन पोलचे पेव फुटले असून इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर सध्या जोरदार बॅटिंग आणि सेटिंग करण्यात मग्न झाले आहेत.

खरं पाहिलं तर असल्या प्रकारामुळे जनतेची दिशाभूल होण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे. परंतु या प्रकाराला आळा घालणारा कोणताही कायदा सध्या तरी अस्तित्वात नाही. त्यामुळे चुकीच्या पोलमुळे अनेकांची फसगत होताना दिसत आहे. ज्यांनी पोल बनविला त्यांनाच मते जास्त जात असल्याने ऑनलाइन सुद्धा फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या मतांचे देखील मॅचफिक्सिंग असल्याची चर्चा दक्षिण उपनगरात सुरू आहे.

पुणे महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर झाली आणि इच्छुकांकडून आडाखे बांधण्यास सुरूवात झाली, कार्यक्रम, वाढदिवस, सहली आणि भेट वस्तूंचे वाटप करणाऱ्या महिलांचे कार्यक्रम यामाध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच निवडणूक नियोजन करणाऱ्या टीमने मत पसंती सर्व्हेचा नवा फंडा बाजारा त आणला आहे. भावी नगरसेवकांनी आपले कार्यकर्ते या कामाला जुंपले आहेत. 

नेटकऱ्यांकडून टोचले जातायत कान-

सध्या सोशल मीडियावर आपणास कोणता उमेदवार योग्य वाटतो, असा प्रश्‍न उपस्थित केला असता. घराणेशाहीचा वारसा चालवणारा?  कमिशन खाणारा? गावातली विकासकामे स्वतःच्या मतलबासाठी अडवून नागरिकांना वेठीस धरणारा? सरकारी जमिनीवर कब्जा करून मोठी कमाई करणारा? मतदारांना भेटवस्तू देणारा? कचरा डेपो आणणारा? बेकायदेशीर सावकारी करणारा? सरळमार्गी पैशाची उधळपट्टी न करता आचारसंहितेचे पालन करणारा? अशा प्रतिप्रश्नाद्वारे नेटकऱ्यांकडून भावी नगरसेवकांची कानटोचणी केली जात आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkatrajकात्रजMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक