फर्ग्युसन रस्त्यावर महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

By राजू हिंगे | Updated: May 7, 2025 22:56 IST2025-05-07T22:55:12+5:302025-05-07T22:56:45+5:30

Pune News: पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने डेक्कन, फर्गसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर कारवाई केली. यामध्ये विविध दुकाने आणि हॉटेल यांनी फ्रंट मार्जिन मध्ये मध्ये केलेल्या अनाधिकृत बांधकाम वर कारवाई करण्यात आली.

Pune: Municipal Corporation's anti-encroachment action on Ferguson Road | फर्ग्युसन रस्त्यावर महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

फर्ग्युसन रस्त्यावर महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

- राजू हिंगे
पुणे - पुणे महापालिकेचा वतीने फर्ग्युसन रस्ता, जे एम रस्ता आणि डेक्कन परिसरात असणाऱ्या अनेक दुकाने  आणि हॉटेलच्या अनाधिकृत भागावर कारवाई करण्यात आली. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. प्रत्येक दहा फुटांवर गाडी आहे. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार याची माहिती देऊनसुद्धा कारवाई होत नाही.

याबाबत नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रारी केला होत्या.त्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.  पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने डेक्कन, फर्गसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर कारवाई केली. यामध्ये विविध दुकाने आणि हॉटेल यांनी फ्रंट मार्जिन मध्ये मध्ये केलेल्या अनाधिकृत बांधकाम वर कारवाई करण्यात आली.

Web Title: Pune: Municipal Corporation's anti-encroachment action on Ferguson Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे