पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतले खासगी ऐवजी सरकारी रुग्णालयात उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:41 IST2026-03-12T09:40:00+5:302026-03-12T09:41:23+5:30

पालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक सहसा इकडे उपचार घेत नाही, त्याऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत करतात

Pune Municipal Corporation's Additional Commissioner sought treatment at a government hospital instead of a private one | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतले खासगी ऐवजी सरकारी रुग्णालयात उपचार

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतले खासगी ऐवजी सरकारी रुग्णालयात उपचार

पुणे : पुणे महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेतात. मात्र, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी कमला नेहरू रुग्णालयामध्ये जाऊन पाठदुखीच्या त्रासावर फिजिओथेरपीचे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिकेचे ५४ दवाखाने, १९ प्रसूतीगृह आहेत. राजीव गांधी रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय आणि सोनवणे दवाखान्यामध्ये लहान मुलासांठी आयसीयू विभाग आहे. पालिकेचे कमला नेहरू हे सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात दरवर्षी २ लाख रुग्ण उपचार घेतात. मात्र, पालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक सहसा इकडे उपचार घेत नाही. त्याऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत करतात. मात्र, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी कमला नेहरू रुग्णालयामध्ये जाऊन पाठदुखीच्या त्रासावर फिजिओथेरपीचे उपचार घेत आहेत. त्यासाठी शॉर्ट वेव्ह डायथर्मी, अल्ट्रासाऊंड वेव्ह्स आणि ऑस्टिओपॅथी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यांनी आतापर्यंत दोनदा उपचार घेतले आहेत.

डॉक्टरांचे मनोबल उंचावले

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेऊन चांगला पायंडा पाडला आहे. या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावर पवनीत कौर यांनी विश्वास दाखविला. त्यामुळे डॉक्टरांचे मनोबल उंचावले आहे.

Web Title : पुणे: अतिरिक्त आयुक्त ने निजी की बजाय सरकारी अस्पताल में कराया इलाज

Web Summary : पुणे महानगरपालिका के अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर ने पीठ दर्द के लिए कमला नेहरू अस्पताल में फिजियोथेरेपी कराई। अधिकारियों द्वारा निजी अस्पतालों को प्राथमिकता देने के विपरीत, उन्होंने सार्वजनिक स्वास्थ्य सेवा पर विश्वास जताया, जिससे अस्पताल कर्मचारियों का मनोबल बढ़ा।

Web Title : Pune Official Chooses Public Hospital Over Private for Treatment

Web Summary : Pune Municipal Corporation's Additional Commissioner Pavneet Kaur opted for physiotherapy at Kamala Nehru Hospital for back pain, setting an example by trusting public healthcare. This boosted the morale of the hospital staff, contrasting with the usual preference for private facilities among officials.